फेब्रुवारी महिन्यापासून काेराेना विषाणूने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आजारग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत आहे. गुरुवारी जवळपास २००० रुग्णांची नाेंद झाली. हाेत असलेल्या काेराेनाच्या उद्रेकामुळे संसर्ग वाढण्याचा धाेका लक्षात घेता, नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांनी साथराेग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नागपूर शहर सीमा तसेच नागपूर ग्रामीण, कामठी व हिंगणा तालुक्यामध्ये १५ ते २१ मार्च या काळात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत नागपूरची उद्यानेही नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता गाेरेवाडा प्राणिसंग्रहालय, जंगल सफारी, बायाेपार्क व निसर्ग पायवाट साेमवारपासून आठवडाभर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती गाेरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
गाेरेवाडा जंगल सफारीही ‘लाॅकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST