शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

बहरलेल्या केळीने सजली परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:48 IST

Gardening केळी म्हटले की आपल्याला चटकन आठवते ते भुसावळ. तिथूनच सर्वत्र केळीची निर्यात होते. नागपूर शहरात केळी फुलवणे म्हणजे काहीसे अवघड अन् नवलाईचेही वाटते. मात्र अजनी, खामला रोडवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आराधना ताठे यांनी आपल्या परसबागेत केळी फुलवली.

ठळक मुद्देफ्लॅटच्या कुंड्यांमध्ये हळद, आले, वांगी अन् टोमॅटोही : आराधना ताठे यांचे प्रेरणादायी बागकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळी म्हटले की आपल्याला चटकन आठवते ते भुसावळ. तिथूनच सर्वत्र केळीची निर्यात होते. नागपूर शहरात केळी फुलवणे म्हणजे काहीसे अवघड अन् नवलाईचेही वाटते. मात्र अजनी, खामला रोडवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आराधना ताठे यांनी आपल्या परसबागेत केळी फुलवली. ती झाडे नुसती वाढली नाही तर बहरलीसुद्धा. आता या केळीच्या घडांनी वाकलेले हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.आराधना ताठे या तशा गृह उद्योजिका पण आम्ही आमच्या आरोग्यासाठी व ग्रामायणशी जुळलेल्या आराधना यांचा केवळ देशी आणि नैसर्गिक वाणाने खाद्यपदार्थ बनविणे हा आग्रह. गर्भवती, स्तनदा माता व त्यांच्या बाळासाठी त्यांचे नैसर्गिक खाद्य उपयोगी म्हणूनही त्यांची ओळख आहे. या नैसर्गिक गोष्टींच्या प्रेमापोटी त्यांना बागकामाचीही आवड निर्माण झाली. त्या फ्लॅटमध्ये राहतात पण गॅलरीत असलेल्या जागेवर त्यांनी बाग फुलवली आहे. प्लॅस्टिकच्या बॅग व कुंड्यांमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केली आहे. यात हळद, अदरक, वांगी, टोमॅटो, मिरची, अंबाडी, शेवगा, मायाळू, मटाळू असे सर्व त्यांनी मोठ्या प्रेमाने फुलवले आहे. त्यासाठी स्वत: तयार केलेल्या नैसर्गिक खताचा उपयोग केला. अशाचप्रकारे दोन वर्षापूर्वी आराधना यांनी बिल्डिंगच्या खाली केळीचे रोपण केले होते. त्याचे संगोपन केले. या संगोपनाने ते रुजले आणि फुललेही. वाढलेल्या या केळीच्या झाडावर दर ५-६ महिन्यांनी केळीचा घड लागत असल्याचे त्या सांगतात. आता योगायोगाने दुसरेही झाड बहरले आहे.फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अनेकांची गॅलरीत बाग फुलविण्याची इच्छा होते पण जागेअभावी त्यांचा हिरमोड होतो. मात्र या अपुऱ्या व्यवस्थेतही बाग फुलवली जाऊ शकते. छोट्या टोपल्या व टाकाऊ प्लास्टिक कंटेनर्समध्ये नैसर्गिक खताने रोपे फुलतात. यातून बागकामाची आवडही पूर्ण होते आणि आहारात त्यांचा वापरही केला जाऊ शकतो. यातून नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल.आराधना ताठे, गृह उद्योजिका

टॅग्स :nagpurनागपूर