शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपा शाळेसमोर ‘कचराघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:32 IST

झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देकचरागाड्या राहतात उभ्या दारुड्यांचा झाला अड्डाहजारो विद्यार्थी घडविलेल्या शाळेची दुरवस्था

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झिंगाबाई टाकळी, मानकापूर परिसरातील महापालिकेच्या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले. आज हे विद्यार्थी समाजात महत्त्वाची पदे भूषवित आहेत. परंतु ही शाळा महापालिकेने दहा वर्षांपासून बंद केली आहे. सद्यस्थितीत या शाळेला कचराघराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या शाळेचा वापर कचरागाड्या उभ्या करण्यासाठी होत आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे.झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. परंतु महानगरपालिकेने ही शाळा बंद केली. या शाळेत परिसरातील गोरगरिब, मजूर, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत होती. ही शाळा बंद झाल्यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सद्यस्थितीत इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. भरमसाट शुल्क देऊन मुलांना शिकविणे गरिबांच्या आवाक्याबाहेरची बाब झाली आहे. परिसरात आजही पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणारी अनेक मुले आहेत. परंतु शाळाच बंद झाल्यामुळे नागरिकांचा नाईलाज झाला आहे. बंद झालेल्या मनपाच्या शाळेचीही दुरवस्था झाली आहे. सध्या या शाळेचा कचरागाड्या ठेवण्यासाठी वापर होत आहे. रात्रीच्या वेळी तर शाळेच्या परिसरात असामाजिक तत्त्व, दारुड्यांचा वावर असतो. कचऱ्याचे ढीग शाळेच्या परिसरात राहतात. त्यामुळे या शाळेची रंगरंगोटी, आकर्षक डिझाईन करून शाळेत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मनपाने ही शाळा सुरु केल्यास गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत.नागरिकांनी घेतली महापौरांची भेटमनपाची शाळा पुनर्जीवित करण्यासाठी झिंगाबाई टाकळी परिसरातील नागरिकांनी सरकारी शाळा वाचवा कृती समिती स्थापन करून महापौर संदीप जोशींसोबत चर्चा केली. महापौरांनी आगामी बजेटमध्ये तरतूद करून शाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षणाधिकारी मिश्रीकोचकर यांनीही शाळेत पालकांसोबत चर्चा केली. महापालिकेने या भागात सर्व्हे करून शाळेत न जाणाºया २५ ते ३० मुलांची यादी केली आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा मनपाने सुरु केल्यास पालकांनी या शाळेत मुले टाकण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती कृती समितीचे संयोजक संजय भिलकर, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, राजन बारई, पापा शिवपेठ, बंडू ठाकरे, राजेंद्र बढिये, संजय सूर्यवंशी, अजय इंगोले, प्रमोद क्षीरसागर, जगदीश गमे यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळा