शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या; त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले

By योगेश पांडे | Updated: July 27, 2023 14:17 IST

मुलाने एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून केला असून तो पळत असल्याची तिने माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीची अल्पवयीन मुलाने तलवारीचे १५ हून अधिक वार करत हत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

पहलवान शहा बाबा दर्गा मार्गाजवळ ही घटना घडली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्यातील रात्रीचे गस्ती पथक त्या मार्गावरून जात असताना एक १७ वर्षांचा मुलगा पळत जाताना दिसला. त्याच्यामागे एक ४० वर्षीय महिला पळत होती. पोलिसांनी महिलेला थांबवून तिला नेमका प्रकार विचारला असता तिने तो तिचा मुलगा असल्याचे सांगितले.

मुलाने एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून केला असून तो पळत असल्याची तिने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता शेखर नावाचा व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अल्पवयीन मुलाने त्याच्या थातीवर तसेच पोट व कंबरेवर तलवारीचे वार करून हत्या केली होती. हत्येत वापरण्यात आलेली तलवार तेथेच पडली होती. पोलिसांनी या प्रकरणात १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी