शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मानकापुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:06 IST

सोबत राहून कचरा वेचणाऱ्या  दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंगरोड जवळच्या गंगानगर झोपडपट्टीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोबत राहून कचरा वेचणाऱ्या  दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंगरोड जवळच्या गंगानगर झोपडपट्टीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. मृताचे नाव गुड्डू आहे.आरोपीचे नाव गौरीनाथ पछेरे (वय ४०) असून, तो गंगानगर झोपडपट्टीत राहतो. गुड्डू आणि पछेरे दोघेही सोबत राहत होते. दोघेही अविवाहित असून, रोज दिवसभर कचरा वेचणे, तो विकून आलेल्या पैशातून दारू पिणे आणि राहणे, असा त्यांचा दिनक्रम होता. सोमवारी नेहमीप्रमाणे कचरा विकून त्यांनी सोबतच दारू पिली. त्यानंतर ते सायंकाळी ५ च्या सुमारास झोपडीसमोर बसले. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. गुड्डूने पछेरेला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपी पछेरे घरात गेला आणि त्याने धारदार चाकू आणून गुड्डूचा गळा चिरला. अनेकांसमोर हे थरारक हत्याकांड घडले. त्यांच्यातील एकाने पोलिसांना कळविले. मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गुड्डूला मेयोत नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांकडून वृत्त लिहिस्तोवर उपलब्ध होऊ शकली नाही.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर