शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पाचा लालपरीला भरभरून आशीर्वाद! महामंडळाच्या ताफ्यात ४० ई-बसेससह ४२५ बसेसचा काफीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:58 IST

रोज ८० ते ९० लाखांचे उत्पन्न. गर्दी वाढली; प्रवासी संख्या एक लाखाच्या घरात

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस धावपळ करणाऱ्या लालपरीला गणपती बाप्पा सध्या भरभरून आशीर्वाद देत आहेत. गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू असताना प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातून दररोज सुमारे एक लाख प्रवासी बसने प्रवास करीत असल्यामुळे एसटीच्या तिजोरीत नागपूर विभागातून रोज ८० ते ९० लाखांची गंगाजळी जमा होत आहे. 

गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात सर्वत्र भरभराटीचे वातावरण असते. अशात प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस धावफळ करणाऱ्या लालपरीला अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसमध्येसुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी होते. गेल्या आठवड्याभरापासून रोज साधारणतः एक लाख प्रवासी एकट्या नागपूर जिल्ह्यातून प्रवास करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ४० ई-बसेससह एकूण ४२५ बसेसचा काफीला आहे. यातील साधारणतः ४०० बसेस रोज नागपुरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सेवेत धावतात. ऑफ सीजन मध्ये रोज नागपूर जिल्ह्यातून ७० ते ८० हजार प्रवासी प्रवास करतात. गणेशोत्सव मात्र एसटीसाठी भरभराट घेऊन येतो. गणेशोत्सवाच्या सध्याच्या काळात साधारणतः रोज एक लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत रोज ८० ते ९० लाख रुपयांची भर पडत आहे.

विशेष म्हणजे, एसटीकडून समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. गेल्या वर्षी राज्य शासनाकडून महिला मुलींना प्रवास भाड्यात सरसकट ५० टक्के सवलत जाहीर झाल्यापासून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा गर्दी जास्त आणि गाड्या कमी असे चित्र दिसते. त्यामुळे एसटीचे प्रवासी नाईलाजाने नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करतात. तूर्त मात्र जवळपास प्रत्येकच मार्गावर एसटीची लालपरी भरभरून धावताना दिसत आहे.प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.श्रीकांत गभणे व्यवस्थापक, एसटी नागपूर विभाग.