शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:26 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : २.१२ लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक अरुण ठवरे आणि सहकारी रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये सेवाग्राम रेल्वेस्थानकावरून गस्त घालत होते. दरम्यान सिंदी ते नागपूर दरम्यान त्यांना ए १ या वातानुकूलित कोचमध्ये बर्थ क्रमांक ३५, ३६ खाली दोन बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना त्याबाबत विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीही आपला हक्क सांगितला नाही. याची सूचना अरुण ठवरे यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान रेक्सने दोन्ही बॅगची तपासणी केली असता त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. दोन्ही बॅग गाडीखाली उतरून तपासणी केली असता त्यात २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा आढळला. कागदोपत्री कारवाई करून जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.