शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या कुख्यात संतोष आंबेकर न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:43 IST

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचा मास्टर मार्इंड म्हणून पोलिसांनी संतोषला आरोपी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून होता फरार : बाल्या गावंडे याच्या खुनाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचा मास्टर मार्इंड म्हणून पोलिसांनी संतोषला आरोपी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता.मृत बाल्या गावंडे मध्य नागपुरातील अनेक भागात मटक्याचे अड्डे चालवित होता. तत्पूर्वी, २०१० मध्ये बाल्याने त्याचा प्रतिस्पर्धी भवानीसिंग सोनी याची हत्या केली होती. त्या प्रकरणात कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केल्यानंतर त्याने गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केला होता. तो प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सक्रिय होता. जमिनीच्या अनेक सौद्यात तो थेट हस्तक्षेप करीत होता. यातून तो कुख्यात संतोष आंबेकरच्या जवळ गेला. अनेक जमिनी, सदनिका, दुकानांवर कब्जा करून त्यांनी लाखो रुपये उकळले होते. २०१३ मध्ये महालमधील बडकस चौकाजवळ ११०० फुटाच्या एका वादग्रस्त जमिनीच्या सौद्यात संतोषच्या म्हणण्यावर प्रॉपर्टी डीलर काळे, ताजणेकर आणि महेश रसाळ या तिघांनी पैसे गुंतवले. ही जमीन नंतर एका कापड व्यावसायिकाला त्यांनी एक कोटी रुपयात विकली. या सौद्यात बाल्याचाही सहभाग होता. त्यामुळे त्याने कमिशन म्हणून तिघांना २० लाख रुपये मागितले. त्यांनी बाल्याला कमिशन म्हणून ६ लाख रुपये दिले होते. उर्वरित १४ लाख रुपये मिळावे म्हणून बाल्या या तिघांना धमकावत होता. त्यामुळे या प्रॉपर्टी डीलरने संतोषला सांगून बाल्याला आवरण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर संतोषने बाल्याला १४ लाख रुपये कशाचे मागतो, असा प्रश्न करून धमकावले होते. त्यावरून संतोष आणि बाल्याचा वाद झाला होता. त्यानंतर बाल्या गावंडे याने संतोष आंबेकरच्या नावाने काही ठिकाणी शिवीगाळ केली होती. बाल्याची खुनशी वृत्ती ध्यानात घेता तो धोकादायक ठरू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले. त्यामुळे त्याने बाल्याला संपवण्याचा कट रचला. बाल्याचा खास मित्र समजला जाणारा आणि बाल्याला जावई मानणारा कुख्यात गुंड योगेश कुंभारे ऊर्फ सावजी (वय ३०) याला काही दिवसांपूर्वी बाल्याने मारहाण केली होती. त्यामुळे संतोषने सावजीलाच फितवले. बाल्याचे अवैध धंदे तू सांभाळ, म्हणत बाल्याचा गेम करण्यासाठी त्याला तयार केले.ओल्या पार्टीनंतर घातठरल्याप्रमाणे २२ जानेवारी २०१७ ला रात्रीच्या वेळी सावजीने त्याच्या तुकारामनगर, कळमना येथील घरी ओल्या पार्टीचे आयोजन केले. बाल्याला घातपाताची शंका येऊ नये म्हणून सावजीने बाल्याची पत्नी जयश्री, त्याची मुलगी आणि प्रशांत पांडे नामक मित्राच्या कुटुंबीयांनाही पार्टीत बोलवून घेतले. सर्व महिलांना लवकर जेवण करायला सांगण्यात आले. छतावर बाल्या आणि सावजी त्याच्या साथीदारांसह दारू पीत बसले. रात्र झाल्याने बाल्याची पत्नी, मुलगी आणि अन्य काही जण आपापल्या घरी गेले. त्यानंतर दारूच्या नशेत टून्न झालेल्या बाल्यावर सावजी आणि त्याचे साथीदार तुटून पडले. तलवारीचे घाव बसल्यानंतर बाल्या जीवाच्या आकांताने पळू लागला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.आरोपी सुटले, संतोष फरारचबाल्याच्या हत्याकांडाने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. कळमना पोलिसांनी या प्रकरणात योगेश कुंभारे ऊर्फ सावजी, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत बोकडे, शुभम धनोरे, जयभारत काळे, महेश रसाळ आणि नवीन ताजनेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशी आणि बयानानंतर संतोष आंबेकर आणि नितेश माने या दोघांना कट रचण्याच्या आरोपात आरोपी बनविले होते. आंबेकरने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्याला यश न आल्याने तो फरार झाला. दरम्यान, या हत्याकांडात अनेक साक्षीदार बदलल्याने कोर्टाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. मात्र, आंबेकर फरार असल्याने त्याच्यावर या गुन्ह्याची सुनावणी वेगळी घेण्याचे ठरले होते.दरम्यान, वर्ष होऊनही संतोषला शोधण्यात यश न आल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यामुळे संतोषवर दडपण वाढवण्यासाठी पोलिसांनी संतोषची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. ते लक्षात घेत संतोष आज अचानक न्यायालयात पोहचला. संतोष आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. ही माहिती शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगारी जगतातील अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संतोषची कारागृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी कळमना पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जाते. या संबंधाने संतोषचे वकील अ‍ॅड. सौरभ सिंह यांनी फारसे बोलण्याचे टाळले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक