शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 13:19 IST

Nagpur News Ganga Jamuna Red light Area विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जात असलेल्या गंगाजमुना या वसाहतीला हटवण्याचे पोलिसी प्रयत्न व त्याला वाचवण्याचे कार्यकर्त्यांचे आंदोलन रविवारी चांगलेच पेटले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जात असलेल्या गंगाजमुना या वसाहतीला हटवण्याचे पोलिसी प्रयत्न व त्याला वाचवण्याचे कार्यकर्त्यांचे आंदोलन रविवारी चांगलेच पेटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या या रणात एकमेकींच्या विरोधात उतरल्याचे दिसले. वारांगनांची ही वस्ती वाचवण्यासाठी कंबर कसलेल्या गंगाजमुना बचाव समितीच्या ज्वाला धोटे आणि नगरसेविका आभा पांडे यांनी एकमेकांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर दुसरीकडे बचाव व हटाव गटांची कारवाई यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यात ज्वाला धोटे या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत तर आभा पांडे पक्षातर्फे नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. (Gangajamuna issue) (Jwala Dhote and Abha Pandey)

काय आहे संघर्ष?गेल्या ९ आॅगस्टपासून गंगाजमुना ही वस्ती हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. येथील अवैध धंदे, दारुची दुकाने, कोरोनाच्या प्रार्दुर्भावाची शक्यता आणि गुन्हेगारीला असलेले पोषक वातावरण दूर करण्यासाठी ही कारवाई असल्याचे सांगितले गेले होते. या भागातील सेक्स वर्कसच्या पुनर्वसनाची कुठलीही योजना जाहीर न करताच शासनाने हा निर्णय घेतला असून, या महिलांना येथून हटवू देणार नाही, अशी भूमिका गंगाजमुना बचाव समितीने घेतली आहे. समितीच्या प्रमुख ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आधी पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे नगरसेविका आभा पांडे यांनी या वस्तीला हटवण्यासाठी जोर एकवटला आहे.

सुमारे दहा एकरात पसरलेली व कोटयवधी रुपये किंमतीची ही वस्ती इतवारी या घाऊक बाजाराला लागूनच असल्याने या बाजाराचा विस्तार करण्यासाठी तिच्यावर अनेक बिल्डर्सचा डोळा असल्याचीही चर्चा जोरात आहे.

टॅग्स :agitationआंदोलन