शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांत टोळीयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 10:53 IST

Nagpur News मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी पुन्हा गुन्हेगारांच्या दोन गटांनी ऐकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत तीन आरोपी जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी पुन्हा गुन्हेगारांच्या दोन गटांनी ऐकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत तीन आरोपी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी एका गटावर अदखलपात्र, तर दुसऱ्या गटाविरुद्ध हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तीन आठवड्यांमध्ये कैद्यांमध्ये मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे कारागृह अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

पाचपावलीतील गुन्हेगार मो. अमीर पटेल खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मंगळवारी दुपारी अमीरवर प्रतिस्पर्धी गुन्हेगार शेख रिजवान शेख मुजीब, प्रज्वल विशाल शेंडे, संतोष अच्छेलाल गोंड यांनी हल्ला केला. त्यांनी लाथा-बुक्क्यांनी अमीरला मारहाण केली. या घटनेमुळे अमीर संतापला. अमीरचे साथीदार सौरभ तायवाडे आणि मोनू समुंद्रे यांनी लोखंडाच्या पट्टीने शेख रिजवानवर हल्ला केला. गालावर वार करून रिजवानला जखमी केले. या हल्ल्यादरम्यान लोखंडाच्या पट्टीमुळे मोनू समुंद्रे स्वत:ही जखमी झाला. बरॅक क्रमांक पाचमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली. या घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, गुन्हेगार जखमी झाल्यामुळे कारागृहात खळबळ उडाल्यामुळे धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलासह पाच कुटुंबीयांचा खून करणाऱ्या क्रूर विवेक पालटकरने २० जूनला राजू वर्मासह तीन गुन्हेगारांना गंभीर जखमी केले होते.

 

....................

टॅग्स :jailतुरुंग