शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, १३ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 21:55 IST

झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली.

ठळक मुद्देपहिली घटना जयपूर-चेन्नई तर दुसरी राजधानी एक्स्प्रेसमधीलनागपूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखलचोरटे गवसलेच नाहीत

आॅनलाईन लोकमतनागपूर : झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या  दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये ज्योती श्रीनाथ डागा (२९) रा. संगमनेर, जयपूर या कोच क्रमांक ए-२, बर्थ ६ वरून मुलीसोबत प्रवास करीत होत्या. रात्री ९.४५ ते १२ दरम्यान त्या झोपी गेल्यानंतर इटारसी ते बैतूल स्थानकादरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या दोन ट्रॉलीबॅग पळविल्या. त्यात डायमंड, सोन्याचे दागिने, कपडे असा एकूण १० लाख २१ हजाराचा मुद्देमाल होता. झोपेतून उठल्यानंतर त्यांना ट्रॉलीबॅग चोरीला गेल्याचे समजले. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. दुसऱ्या  घटनेत अनिता राजेंदर मिया(५७)रा. पंजाब या रेल्वेगाडी क्रमांक १२४४२ निजामुद्दीन-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी-९, बर्थ ४१, ४४ वरून आपल्या पतीसह निजामुद्दीन ते रायपूर असा प्रवास करीत होत्या. पहाटे ४ वाजता त्या झोपेत असताना अज्ञात आरोपीने त्यांची पर्स उघडून त्यातील सोन्याचे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने पळविले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.........

 

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी