शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 20:42 IST

महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप नरकसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्याना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे६० रोहित्रातील तेल चोरले : आरोपीस २५ पर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप नरकसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्याना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मागील वर्षभरापासून रामटेक,नगरधन, मनसर,नेरला,चौगान परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरांच्या टोळीने गावाबाहेरील किंवा शेतात असलेल्या रोहित्रातील तेल चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. रोहित्रातील तेल गायब होत असल्याने महावितरणचे स्थनिक अधिकारी आणि कर्मचारी देखील त्रस्त झाले होते. रात्रीच्या वेळी प्रत्येक रोहित्राच्या ठिकाणी गस्त घालणे शक्य नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले होते. चोरट्यांनी रोहित्रातील तेल चोरून नेल्याने परिसरातील वीज ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. खंडित वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणचा जनमित्रांची दमछाक होऊ लागली होती.दोन दिवसापूर्वी सदर चोरटे आपला कार्यभाग साधण्यासाठी चौगान गावात गेले होते. गावकऱ्यांना हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी विचारपूस केली आणि वस्तुस्थिती माहीत होताच महावितरणच्या अधिकारी वर्गाला माहिती दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चोरट्यांना रामटेक पोलिसांच्या हवाली केले. यातील एक आरोपी हा कांद्रीचा तर दुसरा उज्जैनचा रहिवासी आहे.रोहित्रातील चोरलेले तेल सदर आरोपी कांद्री येथील धाब्यावर ट्रक चालकांना डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी विकत होते. आपला कार्यभाग साधण्यासाठी सदर आरोपी दुचाकी वाहनाचा वापर करायचे. रस्त्यापासून जवळच्या शेतात किंवा निर्मनुष्य ठिकाणी पण दुचाकी जाईल अशा ठिकाणी आपला कार्यभाग साधायचे. चोरी करण्यापूर्वी बांबूच्या मदतीने वीज पुरवठा खंडित करून पाईपच्या मदतीने रोहित्रातील तेल सोबतच्या डबकीत गोळा करीत असल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कन्हान परिसरात देखील अशाच घटना घडल्या होत्या यात आरोपीचा सहभाग आहे की नाही याची तपासणी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीmahavitaranमहावितरण