शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शस्त्रांच्या धाकावर लुटमार करणारी टोळी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:15 IST

नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोन अल्पवयीनसह पाच आरोपीस अटक : सीताबर्डी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे.अक्षय नरेंद्र बन्सोड (१८) वष्करीबाग, निखील सुनील टेंभुर्णे (१९), आकाश कैलास गणवीर रा. मोतीबाग, पाचपावली आणि दोन अल्पवयीन असे आरोपीची नावे आहे. आरोपींनी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री ३.३० वाजता सीताबर्डी, आनंद टॉकीज चौकात कमलेश देशमुख नावाच्या युवकाला अडवून धारदार शस्त्राच्या धाकावर त्याचा मोबाईल व पर्स लुटली होती. यानंतर सीताबर्डीतील टेकडी रोडवर राजस्थानी महिला मंडळ भवनासमोर बॅकवाल्या युवकाला पहाटे ४.३० वाजता रोखून विळ्याने जखमी केले आमि त्याचा मोबाईल व पर्स लुटली.डीसीपी चिन्मय पंडित यांनी शनिवारी पत्रपरिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रात्री उशिरा किंवा पहाटे पादचाºयांना अडवून, त्यांना जखमी करून लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत ठाणेदार जगवेंद्रसिंग यांनी पीएसआय काळे, ए.पी. राऊत, हवालदार अजय काळे, ओमप्रकाश भारतीय, विशाल अंलवार, प्रीतम यादव, संदीप भोकरे, पंकज निकम यांच्या चमूवर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. या चमूला घटनास्थळाजवळ एक अ‍ॅक्टीव्हा गाडीवर संशयास्पद युवक फिरतानाचे फुटेज आढळून आले. तो पाचपावली पोलीस क्वॉर्टरमागे राहत असल्याची माहिती मिळाली. त्याला लष्करीबाग येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने आपल्या साथीदारासोबत लुटमार करीत असल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यानुसार लष्करीबाग रेल्वे लाईनजवळून पर्स, तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. यानंतर अक्षयला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून शस्त्र, चोरीचे मोबाईल व इतर वस्तुंसह १ लाख २० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक