शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:08 IST

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने लुटमार करणाऱ्या  टोळीचा छडा लावून एका तडीपार गुंडासह सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देतडीपार गुंडासह सहा जणांना अटक : कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने लुटमार करणाऱ्या  टोळीचा छडा लावून एका तडीपार गुंडासह सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.श्याम राममूर्ती शर्मा (वय २२), आकाश ऊर्फ बग्गा सतीश मेश्राम (वय १९), पवन ऊर्फ किस्सी तुलसीराम कोरडे (वय २१), आवेश ऊर्फ कालू राजू अन्सारी (वय २०), दुर्गेश नमूचंद टेंभरे (वय २०), सोहित राजू ठाकूर (वय १९), अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी एमआयडीसीतील इंदिरामाता नगरात राहतात. कोरडे हा तडीपार गुंड आहे.२४ जूनच्या पहाटे १.१५ वाजता उपरोक्त आरोपींनी योगेंद्र नामदेवराव चौधरी (वय ३७, रा. पवनसूतनगर, हुडकेश्वर) हे उबेर कारचालक हिंगण्यातून वाडी रोडकडे जाणाºया टी-पॉर्इंटवर थांबले असताना आरोपींनी त्यांना घेरले. त्यांना मारहाण करून तलवारीचा धाक दाखवला आणि दोन हजार रुपये, मोबाईल तसेच त्यांच्या ताब्यातील कार एमएच ४९/एफ १५५९ हिसकावून नेली. गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पथकही त्याचा समांतर तपास करीत होते. एपीआय प्रशांत चौगुले यांना या गुन्हेगाराची टीप मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, एसीपी संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संदीप भोसले, एपीआय प्रशांत चौगुले, गोरख कुंभारा,संजय चव्हाण, पीएसआय श्रीनिवास मिश्रा, वसंता चौरे, हवालदार सुनील चौधरी, नरेश सहारे, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, मंगेश मडावी, राहुल इंगोले, आशिष देवरे, देवीप्रसाद दुबे, राजेश सेंगर आणि नीलेश वडेकर यांनी उपरोक्त टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी या गुन्ह्यासोबतच अन्य एका लुटमारीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक