शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

नागपुरातील जरीपटक्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:33 IST

तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर मध्यरात्री या प्रकरणात पोलिसांनी अपहरण करून बलात्कार करणे आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरात्रभर खोलीत डांबून ठेवले : अनैसर्गिक कृत्यही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर मध्यरात्री या प्रकरणात पोलिसांनी अपहरण करून बलात्कार करणे आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पीडित तरुणी १८ वर्षांची आहे. ती जरीपटक्यात एका झोपडपट्टीत राहते. गरिब कुटुंबातील ही तरुणी ब्युटीपार्लरचे क्लास करते. नेहमीप्रमाणे ती शनिवारी सायंकाळी क्लासला गेली होती. पार्लर बंद असल्याने ती तेथून मैत्रीणीच्या घरी गेली. रात्री ८ च्या सुमारास ती आपल्या घराकडे पायी निघाली. कामठी मार्गावरील पुलाजवळ मागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी कुठे जात आहे, अशी तिला विचारणा केली. तिने त्यांना प्रतिसाद दिला नाही. आरोपींनी तिला तुझ्या घरी सोडून देतो, असे म्हणत तिला जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर मधात बसवले. तेथून आरोपी कामठी नाका नंबर दोन जवळच्या एका घरात पोहचले. तेथे त्यांनी तरुणीचे हात बांधून तोंडावर रुमाल बांधला. त्यानंतर ते दारू पिले आणि तरुणीवर या दोघांनी रात्रभर आलटून पालटून बलात्कार केला. आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला.पोलिसांनी दिवसभर तिष्ठत ठेवलेरविवारी सकाळी ९ च्या सुमारास तरुणी घरी पोहचली. रात्रभर तू कुठे गायब होती, अशी विचारणा करून तिच्या आईने तिला बोलते केले असता तिने त्यांना उपरोक्त प्रकार सांगितला. त्यानंतर दुपारी ती पालकांसह जरीपटका ठाण्यात पोहचली. पोलिसांनी तिला दिवसभर तिष्ठत ठेवले. ही माहिती कळताच परिमंडळ पाचचे प्रभारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रात्री ८ वाजता जरीपटका पोलीस ठाणे गाठून ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-याना खडसावले. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली. तरुणीचे मेडिकल करण्यात आले. तिकडे आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तहसीलमध्ये पोहचले. मध्यरात्री या प्रकरणात अपहरण करून सामुहिक बलात्कार करणे आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कलम ३६६, ३७६ (ड), ३७७, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर