शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  कुख्यात गुन्हेगारांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:15 IST

दीड महिन्यापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातील रोकड लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून देशी कट्टा तसेच काडतूस जप्त करण्यात झोन पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने यश मिळवले.

ठळक मुद्देदेशी कट्टा, काडतूस जप्त : उपायुक्त पोद्दार यांच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीड महिन्यापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातील रोकड लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून देशी कट्टा तसेच काडतूस जप्त करण्यात झोन पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने यश मिळवले. निशांत ऊर्फ सोनू रामराज विश्वकर्मा (वय २१, रा. कुंदनलाल गुप्ता नगर) असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे.उपायुक्त पोद्दार यांच्या पथकातील पोलीस गस्त करीत असताना त्यांना सोनू कडे पिस्तूल असल्याची माहिती कळाली. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे देशी पिस्तुल, काडतूस आणि गुप्ती सापडली. त्याला बोलते केले असता त्याने ४ आॅगस्टला पिस्तुलाच्या धाकावर कळमन्यातील दारूचे दुकान लुटल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात सागर रामप्रसाद श्रीवास (कळमना वस्ती), गौरव ननकूराम साहू (इंदिरानगर), अनिकेत ठाकूर (बिनाकी जामदारवाडी) , बिनाकी मंगळवारीत राहणारे पंकज गुप्ता तसेच विकास साहू सहभागी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही अटक करून कळमना पोलिसांच्या हवाली केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओ. एस. सोनटक्के, पीएसआय जितेंद्र ठाकूर, तसेच राजकुमार जनबंधू, महेश बावणे, पंकज लांडे, विनोद सोनटक्के, सूरज भारती, प्रमोद वाघ, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत आणि मृदुल राऊत यांनी बजावली.विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच नागपुरात रुजू झालेल्या उपायुक्त पोद्दार यांनी परिमंडळ पाचमधील अवैध धंदे करणारे आणि कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम आरंभली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक