शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उड्डाणपुलाखालील पार्कींगच्या वसुलीसाठी गुंडांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहनांची गर्दी विचारात घेता वाहनधारकांना पार्कींगची सुविधा व्हावी. याहेतुने महापालिकेने नवीन पार्किंग धोरण आणले आहे. मात्र कंत्राटदारांनी कामावर ठेवलेले गुंड प्रवृत्तीचे कामगार वाहनधारक व सभ्य नागरिकांसोबत अरेरावी करून त्यांना वेठिस धरतात. असा धक्कादायक प्रकार पंचशील चौकालगतच्या बीग बाजार समोरील उड्डापुलाखालील महापालिकेच्या पार्किंगच्या ठिकाणी सुरू आहे.पार्किंग ...

ठळक मुद्देकंत्राटदाराची अरेरावी : कंत्राट रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहनांची गर्दी विचारात घेता वाहनधारकांना पार्कींगची सुविधा व्हावी. याहेतुने महापालिकेने नवीन पार्किंग धोरण आणले आहे. मात्र कंत्राटदारांनी कामावर ठेवलेले गुंड प्रवृत्तीचे कामगार वाहनधारक व सभ्य नागरिकांसोबत अरेरावी करून त्यांना वेठिस धरतात. असा धक्कादायक प्रकार पंचशील चौकालगतच्या बीग बाजार समोरील उड्डापुलाखालील महापालिकेच्या पार्किंगच्या ठिकाणी सुरू आहे.पार्किंग शुल्क वसुलीसाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांचा समाजातील सर्व घटकांतील नागरिकांशी त्यांचा दैनंदिन संबंध येतो. याचा विचार करता पार्किंग शुल्काची वसुली करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र धंतोली परिसरातील उड्डाणपुलाखालील पार्किंग कंत्राटदार कनक रिर्सोसेस संचालक प्रकाश अंचलवार यांनी वाहनधारकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे युवक ठेवलेले आहेत. पार्किंश शुल्क वसूल करताना नागरिकांना ते धमकावतात. धंतोली परिसरात या गुंड प्रवृत्तीच्या कामगारांची दहशत आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष आहे. विशेष म्हणजे बीग बाजार व परिसरातील बाजारात प्रामुख्याने महिला खरेदीसाठी येतात. महिलांसोबतही येथील गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी असभ्य वर्तन करतात. एवढेच नव्हे तर पोलीस अधिकाºयांनाही ते जुमानत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पार्किग शुल्क वसुलीसाठी ठेवण्यात आलेले गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी तात्काळ हटविण्यात यावे. तसेच प्रकाश अंचलवार यांचा पार्किगचा कंत्राट रद्द करण्यात यावा. अशी महापालिकेच्या मागणी पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम)डी.डी.जांभूळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पार्किं ग शुल्क वसुलीसाठी ठेवण्यात आलेल्या कामगारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का. याची शहानिशा करण्याची गरज आहे.कंत्राटदाराला नोटीस बजावून जाब विचारणारबीग बाजार समोरील उड्डाणपुलाखालील पार्किंग कंत्राटदाराने ठेवलेल्या कामगारांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यासंदर्भात प्रकाश अचंलवार यांना नोटीस बजावून जाब विचारणार आहे. तसेच प्रकरणाची चौकशी करून वाहनधारकांना त्रास होत असल्यास संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता, मनपा

टॅग्स :Parkingपार्किंगCrimeगुन्हा