शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

Ganesh Chaturthi 2018; ‘गाणपत्य आचार्य परंपरा’; श्री गुरुपंचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 09:54 IST

श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. गाणपत्य संप्रदाय गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे.

ठळक मुद्देगुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. कोणत्याही संप्रदायाचे वैभव पाहताना त्याचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्यामध्ये असलेली गुरुपरंपरा हा होय. या गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे. कुठेही प्रसिद्ध न झालेली व वाचनात न आलेली ही माहिती यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथे असलेल्या लोकमान्य महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख प्रा. स्वानंद पुंड यांनी लिहिली आहे.श्रीगुरुपंचकगवान गणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. शैव, वैष्णव, शाक्त या संप्रदायांप्रमाणेच गाणपत्य संप्रदायाचा अत्यंत वैभवशाली असा इतिहास आहे. कोणत्याही संप्रदायाचे वैभव पाहताना त्याचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्यामध्ये असलेली गुरुपरंपरा हा होय. गाणपत्य संप्रदायात गुरुपंचक रूपात ही आद्यगुरु परंपरा वर्णिली आहे. सांप्रदायिक भूमिकेनुसार भगवान श्री गणेशांच्या हातातील कमळ ब्रह्मदेवरूपात, अंकुश विष्णूरूपात, मुद्गल रविरूपात, परशु शिवरूपात तर पाश गुणेशरूपात प्रगट होत असतात. विश्वाच्या संचालनासाठी पाच रूपातील हे परमेश्वर जीवाच्या कल्याणासाठी पंचगुरू रूपांमध्ये अवतार धारण करतात. श्रीब्रह्मदेव श्रीभृगु रूपात, श्री शंकर श्रीशुकाचार्य रूपात, श्रीविष्णू वेदव्यास रूपात, श्रीसूर्य श्रीमुद्गलाचार्य रूपात तर श्रीगुणेश गणकाचार्य रूपात अवतार धारण करतात. या पाच गुरूंना गुरुपंचक असे म्हणतात. श्रीभृगुंना श्रीगुरु, श्रीशुकाचार्यांना परमगुरु, श्री वेदव्यासांना परात्परगुरु श्री मुद्गलाचार्यांना परमेष्ठीगुरु आणि श्री गणकाचार्यांना परब्रह्मगुरु असे संबोधले जाते. हेच गुरुपंचक कलियुगामध्ये अनुक्रमे श्रीब्रह्मानंंद, श्रीआदिशंकराचार्य, श्रीगिरिजासुत, श्रीगणेशयोगिंद्राचार्य आणि श्री गौडपादाचार्य अशा रूपात अवतीर्ण होत असते, अशी गाणपत्य संप्रदायाची भूमिका आहे. या गुरुपंचकासह भगवान श्रीभृशुंडी महाराज आणि महर्षी गृत्समद यांनाही गाणपत्य संप्रदायात विशेष आदराचे स्थान आहे. आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणाऱ्या या लेखमालेच्या रूपात आपण या गाणपत्य आचार्य परंपरेचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करू.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव