शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दिवटेचा गेम प्लान

By admin | Updated: August 29, 2015 03:05 IST

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला यवतमाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार प्रवीण दत्तूजी दिवटे (वय ४१) याला पोलिसांनी अटक केली नसून, ‘गेम प्लान‘नुसार त्यानेच स्वत:चे ...

स्वत:च घडवून आणले अटक नाट्य ?नरेश डोंगरे  नागपूरगेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला यवतमाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार प्रवीण दत्तूजी दिवटे (वय ४१) याला पोलिसांनी अटक केली नसून, ‘गेम प्लान‘नुसार त्यानेच स्वत:चे अटकनाट्य घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे. या संबंधाने नागपूर, यवतमाळ आणि अमरावतीच्या गुन्हेगारी जगतात उलटसुलट तर्क वितर्क लावले जात आहे. दिवटेचे ठिकठिकाणच्या खतरनाक गुंडांशी सलोख्याचे संबंध आणि लेनदेणचे व्यवहार आहे. यवतमाळमधील बांगरनगरात त्याचे राहाणे आहे. मात्र, तो अलिकडे यवतमाळात कमी आणिबाहेरच जास्त वावरतो. जमिनी, बिल्डरचे वादग्रस्त सौदे पद्धतशिर निकाली काढण्याचे त्याचे तंत्र आणि मांडवलीचे कसब चांगल्याचांगल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. त्याचमुळे गुन्हेगारी जगतात दिवटे ‘गेम प्लानर‘ म्हणूनही ओळखला जातो. स्वत:ला पोलिसांसमोर किंवा कारागृहात ठेवून तो गेम करतो. यवतमाळात त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अशाच प्रकारे लंबे केल्याची चर्चा ऐकू येते. आर्थिक व्यवहाराबाबत दिवटे कमालीचा सतर्क आहे. त्यामुळे त्याचे फार काळ कुणाशी सख्य राहात नाही. अमरावतीच्या एका कुख्यात गुन्हेगारासोबत ‘कच-याच्या कंत्राटावरून‘ त्याचे ‘बिनसले, जमले‘ अशी काही दिवसांपासून चर्चा जोरात आहे. नागपुरातील एका गुन्हेगारासोबतही त्याचे दोन महिन्यांपुर्वी फाटले. त्याच्या होमटाऊनमधील अनेक गुन्हेगार त्याच्या आणि तो प्रतिस्पर्ध्यांच्या हिटलिस्टवर आहे.