शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील उच्चभ्रूंच्या सोसायटीत जुगार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:53 IST

उपराजधानीतील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देगोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांचा छापा बडी मंडळी सापडली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यंत उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड आणि मोबाईलसह लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला. या छाप्यानंतर पहाटेपर्यंत नाट्यमय घडामोडी झाल्या. त्यामुळे पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करून जुगाऱ्यांना अटक न करताच सोडून दिले. या घडामोडीमुळे एकीकडे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे शहरातील बडे व्यापारी आणि बिल्डर यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक या मार्गावर गोदरेज आनंदम सोसायटी आहे. येथे शहरातील काही बडे उद्योजक, व्यापारी आणि बिल्डर रोज लाखोंचा जुगार खेळतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. यावेळी अभिषेक युगलकिशोर भट्टड (वय ३८), नितीन प्रभाकर महाजन (वय ४४), नरेश रामलाल सोनी (वय ५९), अजिंक्य अभय पालांदूरकर (वय ३०), नीलेश श्रीकिशन अग्रवाल (वय ३९), पवन अशोक सुधा (वय ३९) आणि सुहास गुणवंत पटेल (वय ४१) हे ताशपत्त्यावर जुगार खेळताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी एक लाख ६०५ रुपये जप्त केले.

पोलिसांवर आणला दबावया हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातल्यानंतर प्रकरण जागच्याजागी मिटवण्यासाठी अनेक उच्चभ्रूंनी प्रयत्न केले, पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. अनेकांचे फोन खणखणले. मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पोलिसांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून रविवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी गुन्हा दाखल केला.

अटक नाही, सूचनापत्र देऊन सोडलेविशेष म्हणजे, जुगार अड्ड्यावर छापा घातल्यानंतर पोलीस जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेतात. त्यांना अटक करून जामीन देतात. येथे पकडण्यात आलेली मंडळी ‘बडी’ असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक न करता केवळ सूचनापत्र देऊन सोडून दिले. जुगाऱ्यांचे मोबाईलही जप्त केले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी