लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून तेथे जुगार खेळणाऱ्या आठ आरोपींना पकडले. जुगाऱ्यांकडून रोख आणि साहित्यासह ४ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.हॉटेल तुलीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त पंडित यांना गुरुवारी रात्री कळली. त्यांनी रात्री ९.३० च्या सुमारास आपल्या सहकाºयांसह हॉटेलमध्ये छापा घातला. यावेळी एका रूममध्ये पोलिसांना आठ जुगारी जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख, १३, ९६० रुपये आणि ताशपत्ते जप्त केले. सरबजीत सिंह सुरजीतसिंह (वय ३६, रा. टेका नाका), मोहम्मद असलम शेख हुसेन (वय ५२, रा. खदान गांधीबाग), अमोल जानराव डांबरे (वय ३५, रा. कमाल चौक), वीरेंद्र सिंह रमेंदर सिंह भाटिया (वय ३४, रा. राजनगर), अमित अजय कक्कर (वय ३५, रा. कडबी चौकाजवळ), राजेंद्रसिंह सुरेंद्रसिंह हुड्डा (वय ३७, रा. लष्करीबाग), शाहीद मोहम्मद यूनुस राजवानी (वय ४८, रा. मस्कासाथ चौक), नरिंदर हरजीतसिंह मारवाह (वय ४२, रा. कश्मिरी गली) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपुरातील बड्या हॉटेलमधील जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 01:22 IST
सदरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून तेथे जुगार खेळणाऱ्या आठ आरोपींना पकडले. जुगाऱ्यांकडून रोख आणि साहित्यासह ४ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
नागपुरातील बड्या हॉटेलमधील जुगार पकडला
ठळक मुद्देआठ जुगाऱ्यांना अटक : ४ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल जप्त