शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

गजभिये हरले - पण जिंकलेही!

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी

एकत्रीकरणातून नवनेतृत्वाचा उदय : दलित राजकारणाला नवी दिशानागपूर : दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी सनदी अधिकारी दिसला व समाजही एक पाऊल पुढे एकत्र आला. राजकीय संधीसाधूंना बाजूला सारत आंबेडकरी समाजात कर्मनिष्ठ नवे नेतृत्व विकसित व्हायला सुरुवात झाली, हा या निवडणुकीने दिलेला बोध आहे. सत्तेसाठी समाजाचा वापर करणाऱ्यांना बाजूला सारून नवनेतृत्व निर्माण करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पदवीधरच्या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी समाज एकत्रीकरणाच्या पहिल्याच लढ्यात ते जिंकले आहेत. सत्ता, पद, स्वार्थासाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे फरफटत जायचे, तर कधी महायुतीत सहभागी होण्याच्या नावाखाली आपले अस्तित्व दुय्यम करून घ्यायचे. रिपाइंच्या एखाद्या गटाला हाताशी धरायचे, त्यांना पद द्यायचे व त्यांना मानणारे दलित मतदार स्वत:कडे वळवून घ्यायचे, असा प्रयोग सर्वच पक्ष करीत आले आहेत. असे प्रकार पाहून दलित समाजातील सुशिक्षित तरुणांच्या मनात एक सल निर्माण झाली. दलित तरुणांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा निर्धार केला. तो निर्धार बऱ्यापैकी वास्तवातही उतरवून दाखविला. त्यामुळे गेल्या आठ- दहा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वावर असलेले डॉ. बबनराव तायवाडे २२ हजारावर थांबले. तर, गेल्या वर्षभरापासून समाजाला संघटित करणारे, जागृती निर्माण करणारे किशोर गजभिये हे १९ हजारावर पोहचले. या निवडणुकीने दलित, बहुजन मतदार किती एकवटला याचा प्रत्यय आला. गजभिये भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी होते. विदर्भ वैधानिक मंडळाचे पहिले सदस्य सचिव होते. विक्रीकर उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. मतदारांनी दाखवून दिली ताकदस्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. पदवीधरच्या प्रचारात ते एकत्रीकरणाचा विचार घेऊनच उतरले. आपण ही निवडणूक आमदार होण्यासाठी नव्हे तर आंबेडकरी, शोषित, मागास समाजाला एकत्र करण्यासाठी लढत आहोत, हे त्यांनी मतदारांना पटवून दिले. मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या सुशिक्षित दलित मतदाराला त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. गजभिये हरले तरी वाघासारखे लढले. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांना विचार करायला लावणारी मते त्यांनी घेतली. भविष्यात दलित राजकारणाची दिशा कशी असेल याचा प्रत्यय देणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी भविष्यात आपण एकवटलो तर काय करू शकतो याची ताकद मतदारांनी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)