शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्झिट पोल्स’नंतर गडकरींच्या घरी राजकीय ‘मंथन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:50 IST

जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल्स’ने भाजपा व रालोआ परत सत्तेत येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे नेते सावध असून निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीवर संघभूमीत मंथन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह व्ही.भागय्या, बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत बराच वेळ चर्चा झाली.

ठळक मुद्देसंघ सरकार्यवाहांची उपस्थिती : उत्तरप्रदेश, बंगालमधील स्थितीवरदेखील झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल्स’ने भाजपा व रालोआ परत सत्तेत येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे नेते सावध असून निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीवर संघभूमीत मंथन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह व्ही.भागय्या, बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत बराच वेळ चर्चा झाली. 

एरवी संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ‘व्हीव्हीआयपी’ नेते संघ मुख्यालयात जातात. मात्र सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अचानक भय्याजी जोशी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. कैलास विजयवर्गीय व व्ही.भागय्या हेदेखील त्याच सुमारास पोहोचले होते. त्यानंतर सुमारे दोन तास विविध मुद्यांवर सखोल मंथन झाले. प्रामुख्याने ‘एक्झिट पोल्स’मधील अंदाज, बंगाल व उत्तरप्रदेशमधील स्थिती व निकालानंतरची संभाव्य पावले यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान विजयवर्गीय यांनी मात्र ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. यात राजकीय विषयांवर नव्हे तर सामाजिक विषयांवर चर्चा झाली. देशाच्या विविध भागात ग्रामविकास, स्वदेशी तसेच अंत्योदय प्रकल्प राबविण्याबाबत ही बैठक होती, असे त्यांनी सांगितले.भाजपाध्यक्षपदी शहाच हवेतअमित शहा यांचा भाजपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. सातत्याने दोनदा ते या पदावर होते. पुढील अध्यक्षपदाबाबत विजयवर्गीय यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता मी कुठल्याही स्पर्धेत नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपाने प्रभावी कामगिरी केली आहे. भाजपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदादेखील तेच हवे. यासाठी पक्षाने नियमांमध्ये शिथिलता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.बंगालमध्ये भाजपाला २० जागा मिळतीलमागील वेळी लोकसभा निवडणुकांत भाजपाला पश्चिम बंगालमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा हा आकडा २० वर पोहोचेल. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ३० वर्षांपासून निवडणुकीत हिंसाचार होतो. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार हे समानार्थी शब्द बनले आहेत. राज्यातील जनता या सर्व गोष्टींना कंटाळली असून त्यांना विकास हवा आहे. भाजपाला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला.प्रज्ञा सिंह चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीभोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंग यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधानांनी आपले मत मांडले असून त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारांची त्यांना पूर्ण माहिती नव्हती. आता त्यांना अनेक गोष्टीबाबत पक्षाचे मत आणि दृष्टिकोन कळला आहे. त्यामुळे भविष्यात त्या बोलताना दक्षता घेतील आणि चुकांची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत असे विजयवर्गीय म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण