शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गडकरी घेणार आमदार, नगरसेवकांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:38 IST

भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड मिळाली नाही. उत्तर नागपुरात तर खीळ बसली. देशात मोठी लाटेचे परिवर्तन त्सुनामीत झाले असताना नागपुरातील लीड कमी झाल्याने भाजपचे मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटलेल्या मताधिक्यावरून गडकरी हे आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा क्लास घेणार आहेत. विधानसभेत एकाद दुसऱ्या आमदारांचा पत्ता कट होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आता संबंधितांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देदणदणित विजय पण मताधिक्य घटले : पश्चिम, मध्य व दक्षिणमध्ये अपेक्षित लीड नाही: उत्तरमध्येही खीळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड मिळाली नाही. उत्तर नागपुरात तर खीळ बसली. देशात मोठी लाटेचे परिवर्तन त्सुनामीत झाले असताना नागपुरातील लीड कमी झाल्याने भाजपचे मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटलेल्या मताधिक्यावरून गडकरी हे आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा क्लास घेणार आहेत. विधानसभेत एकाद दुसऱ्या आमदारांचा पत्ता कट होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आता संबंधितांची चिंता वाढली आहे.गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना २ लाथ १६ हजार ९ मतांनी पराभूत केले. गडकरींना ६ लाख ६० हजार २२१ मते मिळाली. तर पटोले यांना ४ लाख ४४ हजार २१२ मते मिळाली. चार विधानसभेत गडकरींना एक लाखावर मते मिळाली. पूर्व व दक्षिण नागपुरात भगवा लहर चालली. तर मध्य, पश्चिम व उत्तर नागपूरने भाजपला मोठी लीड मिळण्यापासून रोखले. गडकरी राष्ट्रीय नेते आहेत. त्यांची विकास पुरुष अशी इमेज आहे. हेवीवेट नेते असल्यामुळे त्यांनी लोकसभेची निवडणूक खेचून नेली. पण घटलेले मताधिक्य पाहता याचा विधानसभेत फटका बसू नये यासाठी पक्ष पातळीवर आतापासूनच गंभीर दखल घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच आमदारांनी आपल्या मतदारसंघात ५० हजारावर लीड देण्याचा दावा केला होता. मात्र, निकाल तसा आला नाही. त्यामुळे पाठ थोपटून घेण्यासाठी आकडे फुगवून सांगण्यात आले होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता संबंधित आमदारांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून पर्यायी उमेदवाराचाही विचार केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर ज्या प्रभागांमध्ये महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा मताधिक्य कमी झाले त्या नगरसेवकांचीही कानऊघाडणी होणार आहे. पक्षातर्फे संबंधितांची बैठक घेऊन जाब विचारला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रचार धुरा सांभाळताना दक्षिण-पश्चिम मतदारसंघावरही पूर्ण लक्ष दिले. येथे गडकरींना १ लाख २० हजार १८५ मते मिळाली. ५५ हजार ११६ मताधिक्य मिळाले.पूर्व नागपूरने गडकरींना सवाधिक ७५ हजार ३८० मतांची लीड दिली. गेल्यावेळी येथून गडकरींना ६३ हजारांची लीड मिळाली होती. गडकरींना येथे अपेक्षित लीड मिळाल्यामुळे आ. कृष्णा खोपडे ‘गुड बूक’मध्ये आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बक्षीस म्हणून आ. खोपडे यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. उर्वरित चार मतदारसंघात मात्र मताधिक्य लक्षणीय घटले.भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या दक्षिण नागपुरात ४३ हजार ५२४ मतांची आघाडी मिळाली. गेल्यावेळी ६० हजार मतांची आघाडी मिळाली होती. सतीश चतुर्वेदी काँग्रेसमध्ये नसल्यामुळे व येथे काँग्रेस गटातटात विखुरली असल्यामुळे भाजपला मताधिक्य वाढण्याची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMLAआमदार