शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गडकरीच राखणार ‘गड’; ‘एक्झिट पोल’चा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 09:51 IST

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देरामटेकमध्ये सेनेची सरशी होणार असल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. गडकरी परत विजयी होतील व कॉंग्रेसचे नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागेल. तसेच रामटेकमध्येदेखील शिवसेनेचे कृपाल तुमाने हे कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभूत करतील, असा कौल विविध ‘पोल’मधून समोर आला आहे. या ‘एक्झिट पोल’मुळे भाजपा-सेनेच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर होण्यास सुुरुवात झाली. बहुतांश ‘पोल’नुसार देशात रालोआची सत्ता परत येईल, असा कौल देण्यात आला आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध कॉंग्रेसचे नाना पटोले असा सामना आहे. नितीन गडकरी हे मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे तर पटोले हे गडकरींना धक्का देतील, असे दावे कॉंग्रेसकडून करण्यात आले. ‘न्यूज १८-आयपीएसओएस’च्या समोर आलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या सातही जागांवर भाजपा-सेना युतीचेच उमेदवार निवडून येतील.नितीन गडकरी हे नागपुरातून विजयी होतील तुमाने रामटेकची जागा राखतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र टुडेने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणेदेखील गडकरी व तुमाने हेच नागपूर व रामटेकमधून विजयी होतील. याशिवाय विविध वृत्तवाहिन्या व संस्थांच्या ‘पोल’च्या आकडेवारीनुसार गडकरी व तुमाने यांच्याच विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.‘युवा भारती-एसपीए’चा गडकरींनाच कौलयुवा भारती नागपूर व ‘एसपीए’तर्फे केवळ नागपूरच्या जागेबाबत ‘एक्झिट पोल’ जाहीर करण्यात आला. या ‘आॅनलाईन पोल’नुसार नागपुरात गडकरीच विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गडकरींना ६७.४ टक्के तर पटोले यांना २७.४ टक्के मत मिळतील. बसपाचे मोहम्मद जमाल यांना ३ टक्के व वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना १.४ टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कुणबी, तेली, ब्राह्मण, हलबा-कोष्टी,आदिवासी, माळी, सुतार, सोनार, मराठा, माहेश्वरी, जैन समाजाची अर्ध्याहून अधिक मतं गडकरी यांना मिळतील, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.काय म्हणतात ‘एक्झिट पोल’चे अंदाजएक्झिट पोल नागपूर रामटेकन्यूज १८-आयपीएसओएस नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)युवा भारती-एसपीए नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)महाराष्ट्र टुडे नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल