शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम नागपुरात गडकरींनी केले शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:05 IST

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

ठळक मुद्देरॅली काढून जनतेला केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.गडकरींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात चांगलाच जोर धरला होता. बैठका, सभा, समाजाचे मेळावे आणि प्रत्येक विधानसभानिहाय रॅली काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पश्चिम नागपुरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. रामनगर चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेविका माया इवनाते, परिणिता फुके, माजी नगरसेविका राजश्री जिचकार, संजय भेंडे, भूषण शिंगणे यांच्यासह पश्चिम नागपुरातील सर्व भाजपाचे नगरसवेक सहभागी झाले होेते. पांढराबोडी चौक, रविनगर चौक, फुटाळा चौक, हजारीपहाड, गंगानगर, फ्रेड्सकॉलनी, गिट्टीखदान चौक, बोरगाव चौक, पेन्शननगर चौक, अवस्थीनगर चौक, झिंगाबाई टाकळी, फरस चौक, मानकापूर चौक, छावनी चौक, गड्डीगोदाम चौक, सदर चौक आदी ठिकाणी रॅलीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी हात उंचावून गडकरींना प्रतिसाद दिला. त्यांनी दोन्ही हात जोडून जनतेचे अभिवादन स्वीकारले. काही चौकांमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना औक्षण केले. काही ठिकाणी थंड पाणी, ताक आणि पेढेही वाटण्यात आले. रॅलीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथावर गडकरींसह स्थानिक नगरसेवक होते. त्यांच्या मागे मोठ्या संख्येने दुचाकीस्वार भाजपाचा झेंडा घेऊन घोषणा देत, नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन क रीत होते. रॅलीचा समारोप धरमपेठेतील ट्रॅफिक पार्क चौकात झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019