शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गाडीवाला आया घरसे कचरा निकाल वाले बैरागीच राहिले उपेक्षित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:09 IST

‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला.

ठळक मुद्देदेशवासीयांना वेड लावणाऱ्या कलावंताला हवी ओळख अन् हक्काचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून गीताने देशभर पोहचलेल्या या कलावंताच्या गीताचा उपयोग सरकारी यंत्रणेने हवा तसा करून घेतला. सोशल मीडियावरूनही या गीताचे हवे तसे मनोरंजनात्मक चित्रिकरण झाले. मात्र स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला. नेमके तेच दु:ख आणि भावना ‘लोकमत’मध्ये दिलेल्या भेटीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर होत्या.श्याम बैरागी मूळचे मध्य प्रदेशातील मंडलाचे. प्राथमिक शाळा इंद्रीटोला येथे ते शिक्षक आहेत. ‘गाडीवाला आया’ हे गीत त्यांनी २०१६ मध्ये लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देत असताना त्यांना हे लिहिण्याची प्रेरणा झाली. याच दरम्यान मंडला नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना स्वच्छता अभियानावर गीत लिहिण्यास सुचविले. यातूनच या गीताचा जन्म झाला. पुढे जबलपूरमधील स्वरदर्पण या स्टुडिओडून गीताचे ध्वनिमुद्रण झाले. तेव्हापासून हे गाणे शहरातील कचरा संकलन केंद्राच्या वाहनांवर वाजायला लागले.अल्पावधीत लोकांच्या ओठावर आलेले हे गीत एका मित्राच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर पोहचले. या दरम्यान बैरागी यांनी ‘स्याही दिल की डायरी’ नावाचे यु ट्युब चॅनल मित्रांसोबत भागीदारीत उघडले. त्यावर हे गीत अपलोड झाले. मागील सहा महिन्यापासून हे चॅनल बंद पडले आहे. हे गीत नंतर व्हायरल होत गेले. गायक, गीतकाराचा पत्ता नसलेले हे गाणे असेच व्हायरल होत राहिले. राजस्थान, बिहार, गोवा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, झारखंडनंतर आता महाराष्ट्रातील नागपुरातही हे गीत वाजत आहे.आनंद आणि दु:खहीया संदर्भात भावना व्यक्त करताना श्याम बैरागी म्हणाले, जनतेच्या सामाजिक जाणिवा वाढविण्यासाठी आपण भविष्यातही कार्यरत राहू. आपली कला देशभर पोहचली, आपले गीत नागपुरातही वाजत आहे, याचा आनंद आहे. या गीताला आवाज आणि रेकॉर्डिगही आपलेच आहे. मात्र कलावंताकडे दुर्लक्ष करून त्याच्या प्रतिभेचा आणि परिश्रमाचा वापर व्हावा याचे दु:ख आहे.

टॅग्स :Lokmatलोकमतnagpurनागपूर