शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पैशांअभावी भविष्य अंधारात

By admin | Updated: July 22, 2015 03:17 IST

गुणवत्ता असतानाही अपेक्षा हतबल : ओपन कॅटेगिरीचा फटका

लोकमत मदतीचा हातनागपूर : इंजिनीअर बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या अपेक्षा अशोक कोटूरवार या विद्यार्थिनीवर गुणवत्ता असतानाही वंचित राहण्याची वेळ आली आहे. याच अपेक्षाला दहाव्या वर्गात लोकमतच्या आवाहनावर समाजाने मदतीचा हात दिला होता. खडतर परिस्थिती असतानाही गुणवत्तेच्या जोरावर तिने समाजाची अपेक्षा पूर्ण केली. आता स्वप्नांच्या पायथ्याशी पोहोचली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती पुन्हा यशाच्या आड आली आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला पुन्हा समाजाच्या चांगुलपणाची गरज आहे. अपेक्षाच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. घरचा कर्ता खांदा थकल्याने, आई मेसमध्ये पोळ्याचे काम करून पोटापुरता कुटुंबाचा गाढा ओढते आहे. प्रतापनगरातील एका छोट्याशा खोलीत अपेक्षाचे आजारी वडील व आई उपेक्षेचे जीवन जगत आहे. अशातही अपेक्षाने २०१२ मध्ये १० व्या वर्गात ७८ टक्के गुण मिळविले. त्यावेळी पैशाअभावी तिचे पुढचे शिक्षण अशक्यच असल्याने, लोकमतने समाजापर्यंत तिची व्यथा पोहोचविली. माणुसकीच्या भावनेतून समाज तिच्या मदतीला धावून आला. समाजाच्या पाठबळामुळे अपेक्षाचा स्वप्नांचा प्रवास सुरू झाला.धरमपेठ पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल ब्रॅँचमध्ये तिने पॉलिटेक्निक यशस्वी केले. ७० टक्के गुण तिने मिळविले. आता तिने इंजिनीअरिंगसाठी फॉर्म भरला आहे. इंजिनीअरिंगला आपला नंबर लागेल, याचा विश्वास तिला आहे. ती ओपन कॅटेगिरीत येत असल्याने इंजिनीअरिंगच्या प्रवेशाचा खर्च १ ते १.२५ लाख रुपयांचा आहे. घरी एकमेव आई कमावती आहे. तीही केवळ तिघांच्या पोटापुरतीच कमावत असल्याने, इंजिनीअरिींगचा एवढा मोठा खर्च त्यांच्यासाठी डोईजड आहे. (प्रतिनिधी)अपेक्षाला हवीय आपली साथलोकमतच्या आवाहनावर २०१२ मध्ये आपण माणुसकीच्या नात्यातून अपेक्षासाठी धावून आलात. त्यावेळी समाजाने तिच्याबद्दल दाखविलेल्या चांगुलपणाची आजही तिला गरज आहे. आपल्या मदतीमुळे ही गुणवंत मुलगी यशाचे शिखर गाठू शकते. त्यामुळे आपल्या मदतीचा ओघ तिच्यापर्यंत पोहोचू द्या. आपल्याला तिला मदत करायची असेल तर ९३७०८४६५६६ या क्रमांकावर संपर्क साधा.