शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:15 IST

Gowari community Nagpur News अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरच्या सहआयुक्तांनी मार्च महिन्यापासून वैद्यता प्रमाणपत्र समाजाला दिले नाही. त्यामुळे समाजामध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रोखल्या व्हॅलिडीटीसमाजामध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ वर्षाच्या संघषार्नंतर गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले. त्यासाठी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. जात प्रमाणपत्र मिळत असल्याने गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली. पण ही पायवाट काहीच अंतरावर थांबली. लालफितशाहीच त्यांच्या वाटेत अडसर आली. जात वैधता प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा अंधारात आले.गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती लागू व्हाव्यात यासाठी मोठा संघर्ष समाजाला करावा लागला. ११४ लोकांची आहुती समाजाला द्यावी लागली. अखेर उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारींच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. तरी सुद्धा गोवारींना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यासाठी पुन्हा न्यायालयात जावे लागले. २५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश शासनाला दिले. तेव्हापासून फेब्रुवारी २०२० पर्यंत गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरने जात वैधता प्रमाणपत्र दिले.पुढे सरकार गोवारींच्या बाजूने दिलेल्या निर्णयावर स्टे मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्टे दिला नाही. त्यामुळे त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यास काहीच अडचण नव्हती. परंतु अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरच्या सहआयुक्तांनी मार्च महिन्यापासून वैद्यता प्रमाणपत्र समाजाला दिले नाही. त्यामुळे समाजामध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे.- हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेन्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी विभागाने सुद्धा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. पण काही अधिकारी हेतुपुरस्सरपणे समाजाची अडवणूक करीत आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

टॅग्स :Governmentसरकार