शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फुटाळा तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:49 IST

उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षात ४७ आत्महत्या : धंतोली, सीताबर्डी, अंबाझरीत आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. २०१५ पासून धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किती गुन्हे झाले, त्यात आत्महत्यांचे प्रमाण किती होते, त्यात हत्या-महिलांवरील अत्याचार इत्यादींचे प्रमाण किती होते तसेच किती गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार फुटाळा तलावात १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण ४७ जणांनी आपला जीव दिला. २०१६ मध्ये येथे आत्महत्यांचे प्रमाण १४ इतके होते तर २०१८ मधील पहिल्या सात महिन्यांतच १३ जणांनी आत्महत्यांचे पाऊल उचलले. दरम्यान, धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या व्यतिरिक्त साडेतीन वर्षांत २७ जणांना आत्महत्या केली.१८ गुन्हेगार तडीपार१ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५२१९ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत एकूण १८ गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सीताबर्डी व अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी आठ जणांना तडीपार करण्यात आले.फुटाळा तलावातील आत्महत्यावर्ष             आत्महत्या२०१५          १२२०१६         १४२०१७         ८२०१८ (जूनपर्यंत) १३

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावSuicideआत्महत्या