शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:24 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आवाहनानंतरही भाजी बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सक्करदरा येथील बुधवारी भरणारा बाजार बंद केला आहे. परंतु रविवारी या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस विभागाचे वाहन गस्तीवर होते. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात वर्दळ होती. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. शहरातील कॉटन मार्केटमधील भाजीबाजार बंद करून मनपा आयुक्तांनी ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बाजारांना परवानगी दिली. परंतु या बाजारात गर्दी होत असल्याने रेशीमबाग व राजाबाक्षा येथील बाजार बंद करावा लागला. अशीच परिस्थिती धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे भरणाऱ्या बाजारात आहे. होणाºया गर्दीमुळे परिसरातील नागरिकात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील कॉटन मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा बाजार बंद केला. येथे येणारे शेतकरी व येथील दलालांना आयुक्तांनी शहराच्या विविध भागात बाजार तयार करून व्यापाराची संधी दिली. नागरिकांनाही त्यांच्याच परिसरात भाजीपाला मिळावा, असाही आयुक्तांचा हेतू आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दुसरीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने नागरिकात भीती वाढली आहे.बाधित भागातून येणाऱ्यांना कसे ओळखणारवस्त्यातील बाजारातूनही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. शहरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क लावून केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. ज्या वस्त्यांना लागून बाजार सुरू करण्यात आले, तेथे विविध भागातून नागरिक येतात. त्यात कोण कुठून आले, बाधित भागातून आलेल्यांना कसे ओळखणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkshaya Tritiyaअक्षय तृतीया