शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या शस्त्रक्रियागृहाला लागले ‘फंगस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:36 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही तोच शस्त्रक्रियागृहामध्ये बुरशी (फंगस) लागली. परिणामी, अस्थिव्यंगोपचार (आर्थाेपेडिक), कान, नाक, घसा (ईएनटी) व नेत्ररोग विभागाचे शस्त्रक्रियागृह गेल्या २१ दिवसांपासून बंद पडले आहेत.

ठळक मुद्देआर्थाे, ईएनटी, नेत्र विभागाचे शस्त्रक्रियागृह बंद : वातानुकूलित यंत्राचा प्रशासनाला फटका

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही तोच शस्त्रक्रियागृहामध्ये बुरशी (फंगस) लागली. परिणामी, अस्थिव्यंगोपचार (आर्थाेपेडिक), कान, नाक, घसा (ईएनटी) व नेत्ररोग विभागाचे शस्त्रक्रियागृह गेल्या २१ दिवसांपासून बंद पडले आहेत. सूत्रानुसार, बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने जंतुविरहीत हवेसाठी बसविलेल्या यंत्रणेमध्येच घोळ आहे. या यंत्रणेवर वर्षाला ३२ लाख रुपयांचा खर्च होत आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरण सामोर येण्याची शक्यता आहे.मेयोमधील विखुरलेल्या इमारतीवर ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर व २०१० मध्ये जनहित याचिका दाखल झाल्याने २५० खाटांच्या सर्जिकल इमारतीचे बांधकाम सुरू झाले. अनेक घडामोडीनंतर ही इमारत एप्रिल २०१७ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाली. आर्थाेपेडिक, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना येथे प्राधान्य देण्यात आले. परंतु दोन वर्षे होत नाही तोच आर्थाेपेडिक, ईएनटी व नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना ‘फंगस’ लागले. सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे.सूत्रानुसार, बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने या तीनही विभागाच्या प्रत्येकी शस्त्रक्रियागृहामध्ये स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा न लावता ‘हेफा फिल्टर’ लावले. यामुळे शस्त्रक्रिया गृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद केल्यास ‘मॉश्चर’ तयार होत आहे. यातूनच ‘फंगस’ लागल्याचे समोर आले आहे. परिणामी, गेल्या तीन आठवड्यांपासून शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेवर दरवर्षी ३२ लाख रुपये खर्च होतो. हा खर्च मेयो प्रशासनाला परडवणारा नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे सामोर येण्याचीही शक्यता आहे. मेयो प्रशासनाने या बाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्याचे समजते.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)