शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नागपुरातील सहकारनगर घाटावर टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:01 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सहकारनगर घाटावर सुविधांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास मृताच्या नातेवाईकांना टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात, हे वास्तव आहे.

ठळक मुद्देस्मार्ट उपराजधानीतील धक्कादायक प्रकार : पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सहकारनगर घाटावर सुविधांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास मृताच्या नातेवाईकांना टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात, हे वास्तव आहे.सहकारनगर घाटावरील पथदिवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. अंत्यसंस्कारासाठी असलेल्या डोममध्ये रात्रीला अंधार असतो. यामुळे बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात. गुरुवारी रात्री याचा प्रत्यय आला. रात्रीच्या सुमारास लोकांना अंधारातून मोबाईलच्या प्रकाशातून ये-जा करावी लागली. घाटाच्या बाजूला नाला वाहतो. घाटावर साफसफाई होत नसल्याने सापांचा वावर आहे. घाटावरील शेडमध्ये विषारी साप निघाला. यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांत घबराट पसरली होती. भीतीमुळे त्यांच्यात अस्वस्थता होती.या घाटावर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आजूबाजूला रेती, गिट्टी पसरली आहे. लोकांना उभे राहण्यासाठी जागा नाही. शेडची साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण व कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. शौचालय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना झाडांच्या आडोशाने लघुशंका करावी लागते. घाटावर पाण्याची सुविधा नसल्याने धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील व महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये हा घाट येतो. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून विशेष निधी दिला जातो. यातून १५० ते २०० कोटींची विकास कामे सुरू असून, विकासासाठी निधीची कमी नसल्याचा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. असे असूनही सहकारनगर घाटाची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा का, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक प्रकाश भोयर हे झोन सभापती आहेत. तर अ‍ॅड. मिनाक्षी तेलगोटे, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते व पल्लवी श्यामकुळे असे प्रभागातील नगरसेवक आहे. सत्तापक्षाचे नगरसेवक असूनही आपल्याच प्रभागातील दहनघाटाकडे या सर्वांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पाण्याची सुविधा नाहीघाटावर अंत्यसंस्काराचा विधी करताना पाण्याची गरज भासते. परंतु येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. हॅडपंप आहे. परंतु येथ सर्वत्र घाण पसरली आहे. बाजुचे कठडे तुटलेले असल्याने रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे.निर्णय झाला पण सुधारणा नाहीशहरातील दहन घाटावर सुविधांचा अभाव असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने २०१४ मध्ये तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी शहरातील घाटांचा पाहणी दौरा के ला होता. महापालिका प्रशासनाला दहन घाटांवर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दिलेले निर्देश अंमलात आले नाही. आजही घाटावर सुविधांचा अभाव असल्याने मृतकांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. दहन घाटावर सुविधा उपलब्ध होत नसतील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा कशा देतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Sahakar Nagarसहकारनगरcivic issueनागरी समस्या