शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

अ.भा. नाट्य परिषदेला लवकर सुचलेले शहाणपण! दहा कोटींचा नाट्यकर्मी मदतनिधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:58 IST

लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि त्यामुळे आगामी काळात रंगकर्मी भरडला जाऊ नये, या हेतूने नाट्यपरिषदेने दहा कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही काळापासून नाट्यपरिषदेच्या निर्णयांचा विचार करता, हे लवकर सुचलेले शहाणपण असे याचे वर्णन करता येईल.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाविदर्भातही रंगकर्मी असतात, याचा विसर पडू नये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगकर्मींवरही संकट येतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी आपल्यालाही पुढाकार घेऊन रंगकर्मींना आधार द्यावा लागेल, ही जाणिव नाट्यपरिषदेला झालेली दिसते. एव्हाना, नाट्यपरिषद म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या मनमर्जिचा किल्ला, असेच चित्र रंगकर्मींच्या नजरेत आहे. लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि त्यामुळे आगामी काळात रंगकर्मी भरडला जाऊ नये, या हेतूने नाट्यपरिषदेने दहा कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही काळापासून नाट्यपरिषदेच्या निर्णयांचा विचार करता, हे लवकर सुचलेले शहाणपण असे याचे वर्णन करता येईल.कोरोनामुळे भारताला लॉकडाऊनमध्ये जावे लागले. संसर्गाच्या प्रकोपात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागला आहे आणि त्यातही मुंबई, पुणे आणि नागपूर हे तीन जिल्हे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हे तिनही जिल्हे नाट्यक्षेत्राच्या बाबतीत आघाडीचे आहेत आणि नाट्यविषयक कोणत्याही योजना किंवा आविष्कार साधारणपणे या जिल्ह्यांतूनच इतरत्र पोहोचत असतात. स्वाभाविकच जिल्ह्यांचा नजिकच्या क्षेत्रावर उत्तम प्रभाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे नाट्यकला विविधांगाने विकसित होत आहे. लॉकडाऊनमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच नाट्यक्षेत्रही कुलुपबंद झाले आहे. शासकीय आदेशानुसार नियोजित सगळेच नाट्यप्रयोग १५ मार्चपासूनच रद्द करण्यात आले आहेत आणि पुढचे काही महिने तरी नाट्यगृहांचे कुलुप उघडण्याची शक्यता नाहीच. कोरोनाचे उगमस्थान वुहान, चिन येथे लॉकडाऊन उठल्यावर चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक पोहोचत नसल्याने तेथे पुन्हा चित्रपट व नाट्यगृहे बंद करण्यात आली आहेत. ही स्थिती बघता, लॉकडाऊन उठल्यावर महाराष्ट्रातही नाट्यरसिक सहजासहजी नाट्यगृहांकडे वळणार नाही. याचा अर्थ रंगकर्मी व रंगकमार्शी निगडित सर्व यंत्रणा या काळात मोडकळीस जाण्याची शक्यता आहे. ही स्थिती बघता रंगकर्मींची पालक संस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्यपरिषदेने आधार देणे क्रमप्राप्त होते. मात्र, नेहमीप्रमाणे नाट्यपरिषद इकडेही दुर्लक्षच करेल असा कयास होता, तो खोटा ठरला. नाट्यपरिषदेच्या कार्यकारी मंडळाने ऑनलाईन बैठकीत दहा कोटी रुपये गोळा करण्याची घोषणा केली आणि स्वत: ५० लाख रुपये या निधित सादर करत असल्याची घोषणा नाट्यपरिषद अध्यक्षांनी केली. मात्र, हे करताना नेहमीप्रमाणे रंगकर्मींवर पक्षपात होऊ नये, याची काळजी नाट्यपरिषदेकडून घेतली जाणे अपेक्षित आहे. अन्यथा, नाट्यपरिषद म्हणजे केवळ मुंबई असा अट्टहास असणाऱ्या अध्यक्षमहोदयांनी केवळ व्यावसायिक रंगकर्मींचाच विचार करण्याची शक्यता अधिक आहे.रंगकमार्पासून परावृत्त होण्याची •िाती वेगळीच: गेल्या महिनाभरात व्यावसायिक नाट्यक्षेत्राला २५ ते ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हौशी रंगकर्मींना बसलेला फटका वेगळाच आहे. आगामी काळात ही नाट्यक्षेत्राला शंभर कोटी रुपयाहून अधिकचा फटका निश्चितच बसणार आहे. तोच सारासार विचार करता नाट्यपरिषदेने नाट्यनिमार्ता, कलावंत, रंगमंच कामगार यांच्यासाठी मदत जाहीर करण्याचा निर्धार केला आणि दहा कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याची घोषणा केली. कलावंत, नाट्यनिमार्ता, रंगमंच कामगारांना या काळात मदत मिळाली नाही तर ते कलावंत, कामगार रोजगारापोटी रंगकमार्पासून कायमचे परावृत्त होण्याची शक्यता आहे.खऱ्या गरजूंना ओळखावे!: विदर्भात नाट्यपरिषदेचे उत्तम काम चालते. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम येथे शाखा कार्यरत आहेत. तेव्हा विर्भातल खऱ्या गरजू रंगकर्मींना मदतीसाठी शोधण्याची जबाबदारी याच शाखांवर येते. अन्यथा, घोळ होण्याची शक्यता अधिक असते.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस