शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निधी दिला अन् स्थगितीही आणली; अखर्चित ७२ कोटींना जबाबदार कोण?

By गणेश हुड | Updated: June 20, 2024 21:55 IST

जिल्हा परिषदेचे राजकारण तापणार : जनसुविधांची कामे रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी), राज्य व केंद्र सरकारकडून विविध विकासकामांसाठी निधी दिला जातो. परंतु, २०२१-२२ मध्ये प्राप्त झालेला निधी खर्च करण्यास महायुती सरकारने स्थगिती दिली होती. जानेवारी २०२४ मध्ये स्थगिती उठवली. परंतु, हा निधी २८ फेब्रुवारीपर्यंत खर्च करणे शक्य न झाल्याने ३२ कोटी अखर्चित राहिले. तर २०२२-२३ या वर्षाचा निधी मार्च २०२४ मध्ये मिळाल्याने यातील ४० कोटी अखर्चित राहिले. या अखर्चित निधीवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने अखर्चित निधीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेला डीपीसी, केंद्र व राज्य सरकारकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या २९७ कोटींच्या निधीपैकी २५६ कोटी रुपये खर्च झाले, तर ४० कोटींचा निधी अखर्चित राहिला. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्राप्त २४८ कोटींपैकी २१५ कोटी रुपये खर्च झाले, तर ३२ कोटींचा निधी अखर्चित राहिला. याचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. राज्यातील सत्तांतरामुळे निधी खर्च करण्याला स्थगिती देण्यात आली. परिणामी २०२१-२२ या वर्षातील ३२ कोटींचा निधी अखर्चित राहिला. तर २०२२-२३ या वर्षाचा निधी मार्च महिन्यात मिळाल्याने ३१ मार्चपूर्वी मंजूर कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया शक्य न झाल्याने ४० कोटींचा निधी अखर्चित राहिला. दुसरीकडे जन व नागरी सुविधांच्या कामांसाठी निधीची मागणी करूनही हा निधी मिळाला नाही. परिणामी जिल्ह्यातील आवश्यक कामे रखडल्याचे जि. प.तील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी दोन आर्थिक वर्षांची मुदत असते. या मुदतीत खर्च न झाल्यास तो निधी संबधित यंत्रणांना परत करावा लागतो. जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेचा निधी डीपीसीच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या काही मंत्रालयांकडूनही थेट निधी मिळतो. तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठीही निधी मिळत असतो. २०२२-२३ चा निधी मार्च २०२४ पर्यंत खर्च करण्याला मुदत होती. तर २०२१-२२ चा निधी खर्च करण्याला २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदत होती.भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशीची मागणी२०२१-२२ तसेच २०२२-२३ या दोन वर्षांत जिल्हा परिषदेला शासनाकडून प्राप्त निधीपैकी ६५ कोटी २६ लाखांचा निधी अखर्चित राहिला. जिल्हा परिषदेतील सत्तापक्ष याला जबाबदार असून, हा निधी शासनाने परत घ्यावा. निधी खर्च करण्यात अपयशी ठरल्याने जि. प.तील अधिकारी व पदाधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. अखर्चित निधी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत खर्च करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नागपूर जिल्हा महामंत्री गज्जू यादव यांनी गुरूवारी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.