शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ओव्हरटेकिंगची मस्ती, जीवाशी कुस्ती; एकूण रस्ते अपघातांच्या संख्येत मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 09:07 IST

२०१९ साली झालेल्या अपघातांपैकी बहुतांश अपघात हे ओव्हरटेकिंगमुळेच झाले असल्याची बाब एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) समोर आली आहे.

ठळक मुद्देअतिघाईमुळे सर्वाधिक बळी 

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते किंवा महामार्गावर वाहने चालवत असताना समोरच्याच्या पुढे जाण्यासाठी अनेकजण नियमांचा भंग करताना दिसून येतात. मात्र हीच अतिघाई बरेचदा जीवावर बेतते. वाहनावरील ताबा सुटतो व निष्पापांच्या जीवावर आघात होतो.

२०१९ साली नागपुरात १ हजार ११९ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचा बळी गेला व ८९९ लोक जखमी झाले. हे सर्व अपघात एकतर ओव्हरटेकिंग, अतिवेग किंवा दारुच्या नशेत वाहने चालविल्यामुळे झाले. यातील तब्बल ६४ टक्के अपघात हे ओव्हरटेकिंगच्या नादात झाले. तर या कारणामुळे १५९ लोकांना जीव गमवावा लागला. त्या खालोखाल अतिवेगामुळे ३८६ अपघात झाले व त्यात ११० लोकांचा मृत्यू झाला.दरम्यान, २०१५ ते २०१९ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपुरातील रस्ते अपघातांमध्ये घट होत असल्याचे चित्र दिसून आले. २०१५ मध्ये शहरात १ हजार ३९७ अपघातांची नोंद झाली होती व त्यात ३१७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये हाच आकडा १ हजार ५७४ अपघात व ३९६ मृत्यूंवर गेला होता. त्यानंतर सातत्याने अपघातांची संख्या व मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा कमी होत आहे.दुचाकीस्वारांना बसतोय फटकाअतिवेग किंवा ओव्हरटेकिंगच्या नादात होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वारांचेच जात असल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये रस्ते अपघातात १२२ दुचाकीस्वारांचा जीव गेला. त्याखालोखाल ट्रक-ट्रॉलीतील ८१ व कारमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला. विविध अपघातात १० पादचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीवाहन प्रकार        मृत्यूट्रक-ट्रॉली            ८१बस                     १५कार                    २३जीप                        ७आॅटोरिक्षा             ९दुचाकी              १२२सायकल              २पादचारी                  १०एकूण                २७० 

 

टॅग्स :Accidentअपघात