शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गंमत जीवावर बेतली; मित्र बनला वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 22:09 IST

Nagpur News एकमेकांची गंमत सुरू असताना वाद वाढल्यानंतर एका आरोपीने मित्राचा जीव घेतला. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून स्वत:ला अटक करवून घेतली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देआधी दारू प्यायला नेले अन् नंतर त्याची हत्या केली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकमेकांची गंमत सुरू असताना वाद वाढल्यानंतर एका आरोपीने मित्राचा जीव घेतला. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून स्वत:ला अटक करवून घेतली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आकाश सुनील पुरी (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी पुरी आणि अजय गणपत भारती (वय २५) हे दोघे मेहंदीबाग कॉर्नर, गोसावी आखाडा भागात राहायचे. ते सोबतच मजुरीही करायचे. त्यांच्यात चांगली मैत्री होती. त्यामुळे गंमतजंमतही चालायची. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दोघे घराजवळ बसून एकमेकांची गंमत करत होते. शब्द जिव्हारी लागल्याने त्यांच्यात वाद वाढला. तेव्हा कसेबसे निपटल्यानंतर हे दोघे पाचपावलीत गेले. तेथे एका दारूभट्टीवर दारू पिल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी आरोपी पुरीने चाकू काढून अजयवर हल्ला चढवला. छाती, पोट आणि कंबरेवर घाव घातल्याने चाकू अजयच्या शरीररात फसला. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी गंभीर अवस्थेतील अजयला इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मेयोत नेण्याचा सल्ला दिला. मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

परिसरात तणाव

या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येत नातेवाईक आणि बाजूची मंडळी गोळा झाल्याने आरोपी आकाश पुरीला स्वत:च्या जीवाची चिंता वाटू लागली. त्याने आपल्या जवळच्यांना ती बाब सांगितली आणि नंतर स्वत:च यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून अटक करवून घेतली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याचा पीसीआर मिळवला.

----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी