शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
3
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
4
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
5
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
6
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
7
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
8
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
9
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
10
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
11
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
12
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
14
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
15
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
16
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
17
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
18
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
19
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
20
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या

नागपूर जिल्हा न्यायालयात सोमवारपासून पूर्ण वेळ कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:02 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील न्यायालयांमध्ये सोमवारपासून पूर्णवेळ कामकाज होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिपत्रक जारी केले.

ठळक मुद्देपरिपत्रक जारी : ३० जूनपर्यंत लागू राहील नवीन व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील न्यायालयांमध्ये सोमवारपासून पूर्णवेळ कामकाज होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिपत्रक जारी केले. ही नवीन व्यवस्था ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.या कालावधीत न्यायालये सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन सत्रांमध्ये कामकाज करतील. दरम्यान, अत्यंत तातडीची व महत्त्वाची प्रकरणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकली जातील. परंतु, सध्या रोज सर्वच्या सर्व न्यायालये काम करणार नाहीत. रोजच्या कामासाठी न्यायालयांची सारख्या संख्येत विभागणी करण्यात आली आहे. न्यायाधीशांनी या नवीन पद्धतीकरिता वकिलांना प्रोत्साहित करावे. तसेच, प्रकरणांची आठ दिवसाची यादी तयार करून त्याची जिल्हा व तालुका वकील संघटनांना माहिती कळविण्यात यावी. ही यादी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वेबसाईटवरही अपलोड करण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मनाईप्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, त्याची माहिती कार्यालयाला कळविण्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबर संगणक विभागास कळवावा. सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडून मोबाईलवर देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे. त्यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.सामान्य सूचनापरिपत्रकामध्ये विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत.१ - न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेकरिता आवश्यकतेनुसार फेस शिल्डचा वापर करावा.२ - सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींना न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही.३ - न्यायालयात येणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे आवश्यक राहील.४ - निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.५ - वकील, कर्मचारी, पोलिसांसह सर्वांना शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर