शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देतलाठी, तहसीलदार, महाविद्यालय प्राचार्यांची अनास्थानिवासी प्रमाणपत्र देण्यास नकार

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित विद्यार्थ्यांना घोषित दुष्काळग्रस्त क्षेत्रातील निवासी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास कुणीही तयार नाही. अशा स्थितीत विद्यार्थी अडचणीत आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार उच्च शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी २४ डिसेंबर २०१८ रोजी विद्यापीठाला पत्र पाठविले होते. २०१८-१९ मध्ये प्रवेश घेणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यास सांगण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत देण्यात आलेल्या विशेषाधिकारांत यासंदर्भातील मंजुरी दिली होती.सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार प्रक्रिया पूर्ण करायची आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त भागातील निवासी असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याच्या पालकांची वार्षिक आर्थिक मिळकत आठ लाख रुपयांहून कमी आहे हेदेखील सांगायचे आहे. ही प्रमाणपत्रे तलाठी व तहसीलदार कार्यालयातून मिळवायची आहे. मात्र तलाठी व तहसीलदार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देत नसल्याची विद्यापीठ प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे विद्यार्थी योजनेसाठी दावा करु शकलेले नाहीत. विद्यापीठाने प्रमाणपत्रांशिवायच दावे मंजूर करावे, असे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. मात्र नियमानुसार कागदपत्रे नसतील तर दावे स्वीकार केले जाणार नाहीत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. जर दस्तावेज व प्रमाणपत्रांशिवाय दावे स्वीकारले तर परीक्षा शुल्कमाफीची रक्कम शासनाकडून मिळविण्यासाठी अडचणी येतील, अशी विद्यापीठातील अधिकाºयांची भूमिका आहे.प्राचार्य करू शकतात प्रमाणितसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचार्यांना विद्यार्थ्यांचा दावा प्रमाणित करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थी राज्य सरकारद्वारे घोषित दुष्काळग्रस्त भागातील निवासी आहे हे प्राचार्य प्रमाणित करून देऊ शकतात. मात्र प्राचार्यांकडून प्रमाणपत्र देण्यास मनाई करण्यात येत आहे.

प्रमाणपत्रांशिवाय दावा कसा स्वीकारणार ?विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त भागातील निवासी असल्याचे प्रमाणपत्र आणण्याचे राज्य शासनाने अध्यादेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. अशात आम्ही स्वत:कडून कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. नियमांचे पालन आम्हाला करावेच लागणार आहे. प्रमाणपत्रांशिवाय आम्ही दावा कसा स्वीकारणार, असा प्रश्नच प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ