शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या विरहात सासूच्या घरासमोर जावयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 19:43 IST

नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवछत्रपती नगर येथील श्याम पलटूराम विश्वकर्मा याचे तीन वर्षांपूर्वी कुंभारे कॉलनी येथील काजल डहाट या तरुणीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षापूर्वी एक मुलगाही झाला. त्यानंतर घरगुती कारणावरुन पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. वाद सतत वाढतच गेल्यामुळे दोघेही आपापल्या आईवडिलांकडे राहू लागले. काजलने पती श्याम याला काही न सांगता आपल्या एक वर्षाचा मुलाला एका नातेवाईकाला दत्तक दिला. त्यामुळे पती पत्नीत दररोज भांडण होत होते. श्यामने सोमवारी सासरी जाऊन पत्नीला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु सासरच्या मंडळींनी श्यामला काजलशी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे श्यामचा राग अनावर झाल्यामुळे पत्नीच्या विरहात त्याने मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास सासूच्या घराशेजारील झाडावर चढून दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली.झाडावर श्याम लटकलेल्या स्थितीत दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली. यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक आसटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर श्यामचा मृददेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी श्यामचा भाऊ अमर याच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर