शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधानभवनासमोर बेरोजगारीने त्रस्त तरुणाने उडविली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 09:56 IST

रॉकेलची बाटली पॅन्टच्या खिशात घेऊन विधानभवनासमोरच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाने गुरुवारी दुपारी सुरक्षा यंत्रणेची काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडवली.

ठळक मुद्देझाडावर चढून करीत होता आत्महत्येचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : रॉकेलची बाटली पॅन्टच्या खिशात घेऊन विधानभवनासमोरच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाने गुरुवारी दुपारी सुरक्षा यंत्रणेची काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडवली. सुनील भुजंग पाटील (वय २१) असे त्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील धानोरा गावचा सुनील रहिवासी आहे.सुनील खासगी वाहन चालवतो. तो आठवीपर्यंत शिकला आहे. त्याने नोकरी मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, शिक्षण कमी असल्यामुळे त्याला नोकरी काही मिळाली नाही. नियमित रोजगार नसल्याने परिवाराचा उदरनिर्वाह चालविणे त्याला कठीण झाले आहे. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला. हिवाळी अधिवेशात सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतात, असा कुणीतरी चुकीचा सल्ला त्याला दिला. त्यामुळे तो नागपुरात आला. आपली रोजगाराची समस्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी तो गुरुवारी दुपारी विधानभवनासमोर आला. आतमध्ये जायचे आहे, असे त्याने तेथील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाºयांना सांगितले. मात्र, त्याच्याजवळ अधिकृत पास नसल्याने पोलिसांनी तेथून त्याला हुसकावून लावले. बाहेर कुणी मंत्री आले की त्यांना आपली बेरोजगारीची समस्या सांगावी, अशा विचारात तो होता. मात्र, त्याची एकूणच स्थिती पाहून पोलिसांनी त्याला महापालिकेजवळ बनविलेल्या बॅरिकेडसच्या पलीकडे हुसकावून लावले. पोलिसांना हातपाय जोडूनही त्याला ते परिसरात थांबू देत नसल्याने तो संतप्त झाला आणि दुपारी ४ च्या सुमारास महापालिका आणि विधानभवनाच्या मधल्या भागात असलेल्या एका झाडावर चढला. त्याने जवळच्या लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास लावून घेण्याची हालचाल केली. त्याचे मनसुबे ध्यानात आल्यामुळे खाली असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. ती ऐकून बाजूचे पोलीस धावले.सरकारचे लक्ष वेधण्यासाठीसुनीलला सदर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता आपण बेरोजगारीला कंटाळलो असून, आर्थिक कोंडीमुळे आपण आपली व्यथा सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो,असे पोलिसांना सांगितले. रात्रीपर्यंत पोलीस त्याचे समुपदेशन करीत होते.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Suicideआत्महत्या