जीवे मारण्याची धमकी : आरोपी गजाआडनागपूर : पहाटेच्या वेळी घरात शिरून एका तरुणाने त्याच्या जुन्या मैत्रिणीवर पाशवी बलात्कार केला. जरीपटक्यात मंगळवारी पहाटे २.३० ला ही घटना घडली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी स्रेहल बन्सोड (वय २०) याला अटक केली.आरोपी बन्सोडची पीडित मुलीसोबत (वय १७, रा. हुडको कॉलनी) अनेक दिवसांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे तिने त्याच्याशी मैत्री तोडली. परिणामी आरोपी चिडून होता. ती दुसऱ्यासोबत बोलत असल्यामुळे त्याने वचपा काढण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, वडील बाहेरगावी गेल्यामुळे ती, तिची आई आणि भाऊ घरात झोपून होते. मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास मागच्या दारातून आरोपी अचानक तिच्याजवळ आला. आई आणि भाऊ बाजूच्या रूममध्ये असूनही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ओरडल्यास तुला, तुझ्या भावाला आणि आईला जीवे मारीन, अशी धमकीही दिली. बलात्कारानंतर पुन्हा येईल, असे म्हणत आरोपी पळून गेला. त्याच्या धमकीने हादरलेल्या पीडित मुलीने आईला सकाळी ही घटना सांगितली. तेवढ्यात तिचे वडीलही बाहेरगावावरून आले. त्यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार दीपककुमार खोब्रागडे यांनी लगेच बलात्कार, धमकी देणे आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी स्रेहलला दुपारी अटक केली. (प्रतिनिधी)
मित्राने केला बलात्कार
By admin | Updated: May 20, 2015 02:49 IST