शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉलच्या बांधकाम मंजुरीत वारंवार बदल

By admin | Updated: November 2, 2016 02:18 IST

एम्प्रेस मॉलच्या बांधकाम संदर्भात मे.के.एस.इंडस्ट्रीज लि. यांनी सदर जागेवरील अभिन्यासाचा नकाशा मंजुरीसाठी २५ मे २००४ ला सादर केला होता.

मंजुरी नसताना बांधकाम : शासन निर्णय धाब्यावर नागपूर : एम्प्रेस मॉलच्या बांधकाम संदर्भात मे.के.एस.इंडस्ट्रीज लि. यांनी सदर जागेवरील अभिन्यासाचा नकाशा मंजुरीसाठी २५ मे २००४ ला सादर केला होता. त्यानुसार महापालिकेने २८ मे २००५ रोजी औद्योगिक वापरातील अभिन्यासाला मंजुरी दिली होती. त्यानंतर २००७ व २०१३ मध्ये पुन्हा सुधारित नकाशा मंजुरीसाठी सादर करण्यात आला. एम्प्रेस मॉलच्या बांधकामात वारंवार बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु महापालिकेने दिलेली मंजुरी व शासन निर्णय धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात मंजुरीपेक्षा अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे.(प्रतिनिधी)२००५ मध्ये सादर केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीनुसार भूखंड क्रमांक १ व २ येथे ३०२५२. ५९ चौरस मीटर क्षेत्र, भूखंड क्रमांक ३ व ४ येथे १३८२२ चौ.मी., भूखंड क्रमांक ५, २३११९.७५ चौ. मी., सुविधा क्षेत्रासाठी ४७९२.७८ चौ.मी. तर मोकळ्या जागेच्या २३११९.७५ चौ.मी. क्षेत्राचा यात समावेश होता. परंतु विकासकांनी २००९ मध्ये सादर केलेल्या सुधारित प्रस्तावानुसार बांधकाम क्षेत्रात बदल करण्यात आला. त्यानुसार भूखंड क्रमांक १ व २ येथे ७५३१६.२२ चौरस मीटर क्षेत्र, भूखंड क्रमांक ३ व ४ मध्ये ५५६१.९० चौ.मी., भूखंड क्रमांक ५ येथे ३१०७६.४३३ चौ.मी., सुविधा क्षेत्रासाठी ४७९२.८४ चौ.मी. तर मोकळी जागा १४३७८.५८ चौ.मी. क्षेत्रात दर्शविण्यात आली होती. सुविधा क्षेत्र व मोकळ्या जागेत अनुमती न घेता नियमबाह्य बांधकाम करण्यात आलेले आहे. भूखंड १ व २ वरील १२९६.३६ चौ.मी., भूखंड क्रमांक ३ व ४ वरील १८८७२ चौ.मी., भूखंड ५ वर १७७२.९० चौरस मीटर क्षेत्रातील बांधकाम मंजुरीव्यतिरिक्त करण्यात आलेले आहे. तसेच महापालिकेची मंजुरी न घेता अ‍ॅमिनिटी स्पेसमध्ये ९४२४७ चौ.मी. क्षेत्रात बांधकाम करण्यात आलेले आहे. या अतिरिक्त बांधकामामुळे शासनाच्या २० जुलै २००७ च्या निर्णयानुसार आवश्यक असलेली २५ टक्के अ‍ॅमिनिटी स्पेस उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे विकासकांनी बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव दिला होता.