शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘एमएलसी’च्या नावावर नि:शुल्क उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:41 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्या नावाने ‘एमएलसी’ प्रकरण दाखल होत असल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकल : चौकशीसाठी प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्या नावाने ‘एमएलसी’ प्रकरण दाखल होत असल्याचे उघडकीस आले आहे.अपघातात जखमीसह गुन्ह्याच्या संबंधित प्रकरणे व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला अपघात झालेली प्रकरणे ‘एमएलसी’मध्ये मोडतात. अशा रुग्णाची मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) किंवा अपघात विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) तपासणी केल्यानंतर हे प्रकरण ‘एमएलसी’ असल्याची शहनिशा करून रुग्णाच्या नोंदणी कार्डवर ‘एमएलसी’चा शिक्का मारतात. अशा रुग्णांवर नियमानुसार मोफत उपचार केला जातो. एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय काढण्यासाठी पैसे लागत नाही. थेट रुग्णालयात ‘एमएलसी’ रुग्ण आल्यानंतर काही वेळेने डॉक्टर मेडिकल पोलीस चौकीला कळवून माहिती देतात. तसेच रुग्णालयात वा परिसरात ‘एमएलसी’ केसेस आढळल्यास पोलीस चौकीतील हवालदार संबंधित रुग्णाच्या सोबत राहतो. हवालदाराने ‘एफआयआर’ दाखल केल्यानंतर रुग्णाच्या कार्डवर पोलिसाचे नाव व बक्कल नंबर असतो. अशा रुग्णांनाही संबंधित विभागात उपचार मोफत असतो. परंतु, गेल्या वर्षभरापासून मेडिकलमध्येच नाही तर मेयोमध्येही ‘एमएलसी’ रुग्णाच्या नावावर मोफत उपचार घेण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सूत्रानुसार, मेडिकलमधील अनेक प्रकरणात ‘एमएलसी’ रुग्णाच्या नोंदणी कार्डवर एकाच पोलिसाचे नाव व बक्कल नंबर आढळून आले आहे. तर काहींवर हे सुद्धा नसल्याचे सामोर आले आहे. याला गंभीरतेने घेत वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर