शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर बसमध्ये शहिदांच्या पत्नींना मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:58 IST

महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देपरिवहन समितीचा प्रस्तावसंरक्षण, पोलीस व अग्निशमन विभागातील शहिदांच्या पत्नींना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे. तसेच परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात समितीचे सभापती याची अधिकृत घोषणा करणार आहेत.देशाची सेवा करताना शहीद झालेले सैनिक, केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे जवान, पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन विभागातील शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीला मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. परिवहन समिती अर्थसंकल्प १८ मे रोजी स्थायी समितीला सादर केला जाणार आहे.या अर्थसंकल्पात शहिदांच्या पत्नींना मोफत प्रवासासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल.

‘कॉमन मोबिलिटी कार्ड’नागपूर शहरात २०१८-१९ या वर्षात मेट्रो धावण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शहर बस व मेट्रो रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘कॉमन मोबिलिटी कार्ड ’योजना राबविली जाणार आहे. या कार्डाच्या माध्यमातून प्रवाशांना मेट्रो रेल्वे व शहर बसमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी अत्याधुनिक तिकीट मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

दारू पिणाऱ्या चालकावर कारवाईशहर बसच्या चालकांनी दारू पिऊन बस चालवू नये यासाठी ड्युटीवर रुजू होताना थम्ब मशीनवर हजेरी लावतानाच चालकांची मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन विभागाने मशीन खरेदी केल्या आहेत. तसेच चालकांनी दारू पिऊन बस चालवू नये यासाठी भरारी पथकाद्वारे चालकांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. यामुळे अपघाताला आळा बसणार असल्याचा विश्वास सभापती बंटी कुकडे यांनी व्यक्त केला.

मोरभवन बसस्थानकाचा विकासमहापालिका व महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडळ मोरभवन बसस्थानकाच्या मागील बाजूला बसस्थानकाचा विकास कणार आहे. तसेच शहराच्या पूर्व भागातील वाठोडा येथील महापालिकेच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस आॅपरेटरला जागा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच वाडी नाका येथे इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीनबससाठी डेपो उभारला जाणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार