शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्विनी’त वीरपत्नींना करता येणार मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:58 IST

एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुविधा महापालिका उपलब्ध करणार आहे़

ठळक मुद्देमहापालिके ची महिलांसाठी विशेष बसइलेक्ट्रिकवर धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुविधा महापालिका उपलब्ध करणार आहे़शासनाच्या तेजस्विनी योजनेंतर्गत महापालिकेच्या परिवहन विभागात सहा इलेक्ट्रिक मिडी बस पुढील महिन्यात दाखल होणार आहेत़ यापूर्वीही शहरात तीनवेळा महिलांसाठी स्वतंत्र बस चालविण्याचा प्रयोग करण्यात आला, मात्र तो फसला. दरम्यान, आता नव्याने दाखल होणाऱ्या तेजस्विनी इलेक्ट्रिक मिडी बस मोठ्या बसच्या तुलनेत अत्यंत सोयीस्कर असल्याने तसेच फक्त महिलांसाठीच राहणार असल्याने यातून प्रवास करताना कुठलीही अडचण येणार नाही. या बसमध्ये चालक-वाहकदेखील महिलाच असतील़१४ एप्रिल रोजी या सहा बस सुरू करण्याचा परिवहन समितीचा मानस आहे़ पहिल्या दिवशी शहरभर विशेष बस म्हणून या बसेस धावतील़ सहापैकी एका बसमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील महिला प्रवास करतील. दुसऱ्या बसमध्ये लष्कर, निमलष्करी दल, अग्निशमन विभाग आणि पोलीस विभागातील शहिदांच्या पत्नींना शहराची सफर घडविली जाईल़ तिसऱ्या बसमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि महिला उद्योजिकांना, चौथ्या बसमध्ये महिला पत्रकार आणि महिला खेळाडूंना, पाचव्या बसमध्ये महिला वकील आणि विविध खेळातील नामवंत महिलांना तर सहाव्या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवतींना शहराची सफर घडविली जाईल़ उद्घाटनाच्या दिवशी शहरभर या सहाही बसेस मोफत धावतील. या माध्यमातून शहरात बसची माहिती होईल. तर या तेजस्विनी बसमधून वर्षभर वीरपत्नींना वा शहिदांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सोय महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिली जाईल़ यासाठी वीरपत्नी वा त्यांच्या कुटुंबातील महिलांना शासनाकडून मिळालेले कार्ड दाखवावे लागेल़ परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी याबाबत माहिती दिली़ याबाबत नियमावली व प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार आहे़केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेवर धावणाऱ्या बसेस शहरात सुरू कराव्यात, अशी सूचना नागपूर महापालिकेला केली होती़ त्यानुसार परिवहन समितीने पावले टाकलेली आहे़त.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ