शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाडू व शेणाच्या मूर्ती विक्रीसाठी नि:शुल्क जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:23 IST

शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी : मनपात स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी तयारी सुरू आहे. पीओपी मूर्तींबाबत न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पालन केले जाईल. शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उद्देशाने शहरातील गणेश मंडळ व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची महापौर यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालिक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना आणि संकल्पना मांडल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी मातीच्या मूर्तींचीच स्थापना करावी. निर्माल्य तलावामध्ये विसर्जित न करता मनपा व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडे देण्याचे आवाहन करण्यात आले. गणपती मंडळांच्या परवानगीसाठी यावर्षीही झोनस्तरावर सुविधा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली.अनिल सोले म्हणाले, शहरातील पर्यावरणपूरक गणेशेत्सव साजरा करण्यामध्ये स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. मनपा आणि नागरिकांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून स्वयंसेवी संस्था कार्य करतात. कोणत्याही समाजोपयोगी गोष्टीचे यश समाजाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्मुळेच नागपूरने नाव मिळविले आहे. आत कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जनाच्या बाबतीत नागपूर अग्रेसर आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्थांसह गणपती मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.विसर्जन ठिकाणी दिवसभर स्वच्छता राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्थेसह सुरळीत वाहतूक राहावी यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.प्रारंभी ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तींच्या दुष्परिणामाची माहिती दिली. नागरिकांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व इतर सहकायार्साठी ग्रीन व्हीजील यंदाही मनपाच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. नियमानुसार पीओपी विक्री करणाऱ्यांनी त्यासंदर्भातील नियमांचे फलक लावणे आवश्यक आहे. मूर्तीमागे लाल खूण करणेही आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुनील कांबळे यांनी तर आभार भावना सोनकुसळे यांनी मानले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव