शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आयआरसी अधिवेशनाच्या तयारीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:07 IST

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये भव्य स्वरुपात होणार असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या तयारीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मोकळा केला. अधिवेशनासाठी आवश्यक व्यवस्था तयार करून देण्याचे कंत्राट अ‍ॅडमार्क कंपनीला मिळाले आहे. उच्च न्यायालयाने या कंपनीला कार्यादेशानुसार काम सुरू करण्याची सशर्त मुभा दिली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दिलासा : अ‍ॅड मार्क कंपनीकडे कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये भव्य स्वरुपात होणार असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या तयारीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मोकळा केला. अधिवेशनासाठी आवश्यक व्यवस्था तयार करून देण्याचे कंत्राट अ‍ॅडमार्क कंपनीला मिळाले आहे. उच्च न्यायालयाने या कंपनीला कार्यादेशानुसार काम सुरू करण्याची सशर्त मुभा दिली.या कंत्राटाच्या तांत्रिक मूल्यांकनावर व आर्थिक बोलीवर विविध आक्षेप नोंदविल्यानंतरही आवश्यक न्याय मिळाला नसल्याचा दावा करून वुई दि वर्किंग एलिमेंट या प्रतिस्पर्धी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गत १ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावून यावर १९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, तोपर्यंत कोणालाही कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश दिला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच म्हणजे २९ आॅक्टोबर रोजी अ‍ॅडमार्क कंपनीला कार्यादेश जारी केला होता. असे असले तरी न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अधिवेशनाच्या तयारीचे काम खोळंबले होते. अधिवेशनाला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत न्यायालयातील पुढच्या तारखेपर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा केल्यास उरलेल्या दोन दिवसात आवश्यक व्यवस्था पूर्ण करणे अशक्य होते. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभाग व अ‍ॅडमार्क यांनी शुक्रवारी अवकाशकालीन न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष हे प्रकरण लावून घेतले व अंतरिम आदेशामध्ये बदल करण्याची विनंती केली.न्यायालयाने प्रकरणातील ही सुधारित परिस्थिती लक्षात घेता अंतरिम आदेशात बदल करून अ‍ॅडमार्क कंपनीला न्यायालयाच्या पुढील आदेशाधीन राहून कार्यादेशाप्रमाणे काम करण्याची मुभा दिली. तसेच, पुढील तारखेपर्यंत अ‍ॅडमार्क कंपनीला त्यांनी केलेल्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण व अ‍ॅड. निखिल कीर्तने, सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश घरोटे तर, अ‍ॅड मार्कतर्फे अ‍ॅड. नचिकेत मोहरीर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे