शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भूकेलेल्या गरजूंना मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 00:04 IST

देवळा : गरजूंना मदतीचा हात देण्याची आजोबांची परंपरा नातू जपत असून कोरोना काळातही आपल्या आजोबांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा खंडीत न होऊ देता ती नियमितपणे सुरू ठेवत नईम शेख यांनी पुढे केलेला गरजूंना मदतीचा हात आज अनेक भुकेल्यांना जीवदान देणारा ठरत आहे.

ठळक मुद्देदेवळा : उपाशीपोटी झोपणाऱ्यांना मिळतात चार घास

देवळा : गरजूंना मदतीचा हात देण्याची आजोबांची परंपरा नातू जपत असून कोरोना काळातही आपल्या आजोबांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा खंडीत न होऊ देता ती नियमितपणे सुरू ठेवत नईम शेख यांनी पुढे केलेला गरजूंना मदतीचा हात आज अनेक भुकेल्यांना जीवदान देणारा ठरत आहे.स्व.अमीर शेख यांनी १९७५ साली देवळा शहरात पहिली खानावळ सुरू केली. भरपेट व स्वस्त जेवण देणारी शेख खानावळ अशी ओळख, खानावळीत येणाऱ्या एखाद्याकडे पैसे कमी असले तरी तो जेवण करुनच बाहेर पडत असत.अमीर शेख यांच्या निधनानंतर हि अन्नदानाची परंपरा हाजी सगीर शेख, व त्यांचे बंधु यांनी पुढे सुरू ठेवली. सद्या नईम शेख हे खानावळ चालवतात. रात्री हॉटेलवर कोणी गरीब आल्यास त्याला विनामुल्य जेवण देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे.कोरोनाच्या संचार बंदी काळात व लॉकडाऊनमुळे अनेकांना अन्नासाठी वणवण करावे लागत आहे. हे पाहून नईम शेख यांनी गरजूंना मदतीचा हात या उपक्रमाखाली देवळा शहरातील पाच कंदील, दुर्गा माता मंदिर, तसेच बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी गरजूंचा शोध घेऊन त्यांना पाण्याची बाटली, व जेवण देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे अनेक गरीब, गरजूंच्या पोटात रोज चार घास जावू लागले आहेत.कोरोनामुळे अनुभवलेल्या या सध्याच्या बिकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी. ोवेगवेगळ्या परीस्थितीत अनेकजण उपाशीपोटी झोपत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासाठी काही करावे ह्या भावनेतून गरजूंना मदतीचा हात हा उपक्रम सुरू केला असून गावात कोणी उपाशी राहू नये यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. दररोज दहा ते पंधरा व्यक्तिंच्या जेवणाची सोय करित आहे.- नईम शेख, खानावळ मालक, देवळा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक