शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या मोकळ्या श्वासावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST

- उद्यानात प्रवेशासाठी वसुली कशासाठी? : ...तर निवडणुकीत मोजावी लागेल मोठी किंमत - लढा शुद्ध हवेसाठी लोकमत न्यूज ...

- उद्यानात प्रवेशासाठी वसुली कशासाठी? : ...तर निवडणुकीत मोजावी लागेल मोठी किंमत

- लढा शुद्ध हवेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’च्या संकटकाळातून नागपूरकर कसेबसे सावरले आहेत. आरोग्याप्रतीही जागरूक झाले आहेत; पण आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायामासह शुद्ध मोकळी हवा घेणे गरजेचे झाले आहे. असे असताना महापालिकेने मात्र, नागपूरकरांना आता उद्यानात प्रवेश देताना शुल्क वसुली करण्याचा हिटलरी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उद्यानात फेरफटका मारण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठीही पैसे मोजायचे का? महापालिकेच्या हाती भिकेचे कटोरे आले आहे का, असा संतप्त सवाल नागपूरकरांनी केला आहे. महापालिकेने प्रवेश शुल्क लावून एक प्रकारे उद्यानांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात सुजाण नागपूरकरांनी समोर येत लोकलढा उभारण्याचे आवाहन केले असून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वेळीच या शुल्कावर फेरविचार केला नाही तर त्यांना आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

सोमवारीच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. कधी नव्हे तेवढा निधी आरोग्य क्षेत्रासाठी आरक्षित करण्यात आला आहे. असे असताना महापालिकेला मात्र नागरिकांच्या आरोग्याचे वावडे असल्याचे या धोरणावरून स्पष्ट होत आहे. सिमेंटीकरणाच्या जंगलात वावरणाऱ्या नागरिकांना शुद्ध हवेसाठी उद्यानांचाच तेवढा आधार असतो. मात्र, ही उद्याने महापालिकेच्या व्यावसायिक धोरणाच्या घशात जात आहेत. शहरातील ६९ उद्याने खाजगी संस्थांना चालविण्यास दिले जात आहे. मनपी तिजोरी रिकामी असल्याने ही उद्याने चालविणे जड जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे. ही उद्याने खाजगी संस्थांच्या हाती गेल्यावर तेथे प्रवेश करण्यासाठी नागरिकांकडून शुल्क वसूल केले जाणार आहे. हा निर्णय म्हणजे, नागरिकांच्या मोकळ्या श्वासावरच निर्बंध आणण्याचा प्रकार आहे. उद्यानांच्या, वृक्षवल्लींच्या सान्निध्यात दिवसाचा एक वेळ घालवून आरोग्याची धनसंपदा मजबूत करणाऱ्या सर्वसामान्यांच्या उदात्त हेतूलाच नाकारले जात आहे.

नागपूर सिटिझन फोरमने चालविली स्वाक्षरी मोहीम

उद्यानांमध्ये प्रवेश व पार्किंग शुल्क आकारणीचा विरोध करत नागपूर सिटिझन फोरमने निषेध आंदोलनाची सुरुवात करत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. उद्यानात दररोज येणारे नागरिक या आंदोलनात सहभागी असू, आम्ही प्रवेश शुल्क देणार नाही, असे फलक हाती घेऊन लोकांनी मनपाचा निषेध केला. हे अभियान गजेंद्र सिंह लोहिया, प्रतीक बैरागी, वैभव शिंदे पाटील, अभिजीत सिंह चंदेल, अभिजीत झा, अमित बांदूरकर व साईदूत अनुप हे राबवीत आहेत.

गांधीसागर उद्यान संस्थेकडून निषेध

गांधीसागर उद्यान बीओटी तत्त्वावर चालविण्याच्या निर्णयाचा निषेध गांधीसागर उद्यान संस्था व उद्यानप्रेमींनी एका सभेद्वारे केला आहे. गांधीसागर उद्यान हे शहिदांचे स्मारक म्हणूनही ओळखले जाते. हा एक ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे, सशुल्क प्रवेशाचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी बबलू बेहरखेडे, नीरज चौबे, धीरज वाघ, प्रशांत चरपे, नंदू लेकुरवारे, कृष्णकुमार पडवंशी, देवेंद्र नेरकर, राजू दैवतकर यांच्यासह शेकडो उद्यानप्रेमी उपस्थित होते.

अन्याय निवारण समिती याचिका दाखल करणार

मनपाच्या या निर्णयाविरोधात नागपूर नागरिक अन्याय निवारण समितीच्या वतीने भूषण दडवे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाविरोधात नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्र्यांनी आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, प्रत्येक उद्यानासमोर आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचा विरोध, आंदोलनाचा इशारा

- उद्यानातील प्रवेश शुल्काला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. शहरप्रमुख दीपक कापसे यांनी शुल्क आकारणी मागे न घेतल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना उद्यानात जाता येणार नाही. पदाधिकाऱ्यांनी कर वसुलीकडे लक्ष न देता सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेला कोणत्याही परिस्थितीत ही मनमानी करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

...............